IMPIMP

Lockdown in Maharashtra | महाराष्ट्रात Lockdown की कडक निर्बंध? CM उद्धव ठाकरे घेणार निर्णय

by nagesh
Coronavirus In Maharashtra | mask compulsory again in maharashtra likely to be decided soon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Lockdown in Maharashtra | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांचा (Coronavirus) आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणाची धांदळ उडाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध (Lockdown in Maharashtra) लागणार याबाबत चर्चा सुरू आहे. निर्बंध लावण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray घेणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊन किंवा रात्रीच्या संचारबंदीसारखे कठोर निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतरच घेण्याची भूमिका मुख्यमंंत्री ठाकरे यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे आता राज्यात कठोर निर्बंध लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्याची चर्चा गेली दोन दिवस होत आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती (Chief Secretary Debashish Chakraborty) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) आणि जिल्हाधिका-यांच्या (Collector) मॅरेथॉन बैठकीत राज्यभरातील स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान, सध्या मुंबई महानगर परिसरातच मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून आली आहे. सर्वाधिक लसीकरण (Vaccination) याच भागात झाल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे राज्याच्या अन्य ठिकाणी खरं तर ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. (Lockdown in Maharashtra)

 

 

आज राज्यातील निर्बंधाबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
जेणेकरून गर्दी टाळणे, अनावश्यक कार्यक्रम रोखता येणे शक्य होणार आहे.
तसेच, प्रशासनाला आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हानिहाय ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.
तसेच मार्चपर्यंत कोरोना निधीची तयारी करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, मागील एक-दोन दिवसांपुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील राज्यात कडक निर्बंध लावण्याबाबत संकेत दिले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांंनी देखील निर्बंधाबाबत कडक इशारा देत संकेत दिले होते. मात्र याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. या दरम्यान आता राज्यात कठोर निर्बंध लावण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

 

Web Title :-  Lockdown in Maharashtra | lockdown or strict restrictions in maharashtra decision will be taken by chief minister uddhav thackeray soon

 

हे देखील वाचा :

Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील 141 पोलिसांना कोरोनाची लागण; विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाईस सुरुवात, 2 दिवसात दीड हजारांवर कारवाई

Pune Crime | बहिणीला दिली पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ! तिने घेतले 1 कोटी 40 लाखांचे कर्ज; रेलिगेर फिनवेस्ट लि. विरूध्द गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Grahak Peth Pune | ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवात बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणी पर्यंत तब्बल 45 प्रकार; अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी म्हणाल्या – ‘गृहिणींकरीता विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी’

 

Related Posts