IMPIMP

Pune News | सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कॅनॉललगतच्या रस्त्याचे काम तातडीने करा, स्वीकृत सदस्य अभिजित बारवकर यांची मागणी

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  सिंहगड रस्ता हा पुणे शहरातील (Pune News) महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरील वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी राजाराम पूल (Rajaram Pool) ते फन टाईम (Fun Time) दरम्यान उड्डाणपूल (Flyover) बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपूलाचे काम करताना होणारी वाहतूक कोंडी (Traffic jams) लक्षात घेता कॅनॉललगत असलेल्या पर्यायी रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी स्वीकृत सदस्य अभिजीत बारवकर (Abhijeet Barwakar) यांनी पुणे (Pune News) महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अभिजीत बारवकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, सिंहगड रस्ता (Sinhagad Road) हा शहरातील महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावरील वाहतूकीचा
प्रश्न सोडवण्यासाठी या रस्त्यास पर्याय असलेला रोहन कृतिका सोसायटी मागील हिंगणे ते जनता वसाहत हा रस्ता करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाकडून हे काम सुरु करण्यात आले आहे.
मात्र, या रस्त्यामध्ये कलव्हर्टचे काम झाले नसल्याने हा रस्ता पूर्ण झालेला नाही.

 

पुणे महापालिकेकडून (Pune Corporation) सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत उड्डाणपूलाचे काम चालू करण्यात येणार आहे.
या कामामुळे सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करुन हा रस्ता वाहतूकीस खुला करावा.
रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत उड्डाणपूलाचे काम सुरु करुन नये, अशी मागणी बारवकर यांनी केली (Pune News) आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तसेच सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत उड्डाणपूलाचे काम करण्यासाठी या रस्त्यास पर्यायी
असलेला रस्ता हिंगणे ते जनता वसाहत हा कॅनॉललगतचा रस्ता पूर्ण करुन नागरिकांसाठी खुला करावा, अशीही मागणी अभिजीत बारवकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

Web Title : Pune News | Approved member Abhijit Barwakar’s demand to work on the road near the canal immediately to avoid traffic jam on Sinhagad road

 

हे देखील वाचा :

Earn Money | सरकारकडून 90% सबसिडी घेऊन सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहिना होईल 2 लाख रुपयांपर्यंत नफा

Pune Crime | भाजप नगरसेवक धनराज घोगरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या कोर्टात काय झाला युक्तीवाद

Corona Vaccine | खुशखबर ! दिर्घ प्रतीक्षेनंतर अखेर स्वदेशी व्हॅक्सीन Covaxin ला जागतिक पातळीवर मान्यता, मेडिकल जर्नल लान्सेंटकडून शिक्कामोर्तब

 

Related Posts