IMPIMP

SSY | व्याजदर वाढण्यापूर्वी सुकन्या समृद्धीमध्ये झाले 5 बदल, पैसे जमा करणार्‍यांनी जाणून घ्यावे

by nagesh
SSY | Sukanya samriddhi yojana major changes before review on interest rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSY | सप्टेंबरअखेर संपणार्‍या तिमाहीत सरकार व्याजदरात वाढ जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्राच्या मुलींसाठी
चालवल्या जाणार्‍या या योजनेवर सध्या 7.60 टक्के व्याजदर आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कलम 80सी अंतर्गत प्राप्तीकरातून सूटही मिळते.
एसएसवायमधील 5 प्रमुख बदलांबद्दल जाणून घेऊया. (SSY)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुकन्या समृद्धी योजनेच्या Sukanya Samriddhi Yojana (SSY) नवीन नियमांतर्गत खात्यातील चुकीचे व्याज टाकल्यास ते ते पुन्हा पलटण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल. यापूर्वी ते तिमाही आधारावर खात्यात जमा केले जात होते. (SSY)

 

पूर्वीच्या नियमांनुसार, मुलगी 10 वर्षांची झाल्यावर खाते ऑपरेट करू शकत होती. मात्र नव्या नियमांमध्ये यात बदल करण्यात आला आहे. आता मुलींना 18 वर्षापूर्वी खाते चालवण्याची परवानगी नाही. 18 वर्षे वयापर्यंत फक्त पालक खाते चालवतील.

 

सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात वार्षिक किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करण्याची तरतूद आहे. किमान रक्कम जमा न केल्यास खाते डीफॉल्ट होते. नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मुदतपूर्तीपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल. पूर्वी असे नव्हते.

 

यापूर्वी, 80सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता.
मात्र आता सुकन्या समृद्धी योजनेचे खाते तिसर्‍या मुलीच्या जन्मानंतरही उघडता येणार आहे.
वास्तविक, आता पहिल्या मुलीनंतर जन्मलेल्या दोन जुळ्या मुलींसाठी खाते उघडण्याची तरतूद आहे.
अशा प्रकारे एक व्यक्ती तीन मुलींसाठी खाते उघडू शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

’सुकन्या समृद्धी योजने’चे खाते मुलीच्या मृत्यूनंतर किंवा मुलीचे निवासस्थान बदलल्यानंतर बंद केले जाऊ शकते.
मात्र आता यामध्ये खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश करण्यात आला आहे.
पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.

 

Web Title :- SSY | Sukanya samriddhi yojana major changes before review on interest rate

 

हे देखील वाचा :

Ganeshotsav 2022 | राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 5 लाखांचा पुरस्कार, राज्य सरकारची घोषणा

विना आधार नंबर डाऊनलोड करा E-Aadhaar, फक्त करावे लागेल हे काम

Maharashtra Politics | शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना धक्का देण्याची तयारी, श्रीकांत शिंदेंना मिळणार ‘ही’ जबाबदारी?

 

Related Posts