IMPIMP

State Education Quality Index | राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली; ‘पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांना येईना वजाबाकी, भागाकार…’

by nagesh
State Education Quality Index | aser conducted suvery over educational quality of maharashtra know the horrible situation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   State Education Quality Index | कोरोनाकाळात घेतल्या गेलेल्या ऑनलाईन शिक्षणाचा फटका विद्यार्थ्यांना चांगलाच बसला आहे. त्यामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता कमालीची ढासळली आहे. कोरोनाकाळ सरल्यानंतर याबाबतची माहिती आता समोर येत आहे. यात कोरोनाकाळानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळल्याचे समोर आले आले आहे. (State Education Quality Index )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

इयत्ता पाचवीतील साधारण ८० टक्के विद्यार्थ्यांना दोन अंकी संख्येची वजाबाकी करता आली नाही तर ६५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित सोडविता आले नाही. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने देशभर ‘अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) सर्वेक्षण केले. यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन कडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात (State Education Quality Index ), पायाभूत सुविधांची उपलब्धता कमी झाली असून, पाचवीतील ४४ टक्के, तर आठवीतील २४ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तराचे मराठी वाचन येत नसल्याचे उघड झाले आहे. हे सर्वेक्षण कोरोना काळपूर्वी देखील करण्यात आले होते. पूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत या वर्षी किमान क्षमता विकसीत झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांनी घटले आहे.

 

असरचे सर्वेक्षण महाराष्ट्रातील ३३ जिल्हे, ९८३ गावे, १९३९६ घरे आणि ८२३ शाळांमध्ये पार पडले. यामध्ये महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील पटसंख्या २०१८ मध्ये ६१.६ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ६७.४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर २०१८ च्या ३७.६ टक्क्यांवरून खाजगी शाळांमध्ये ते ३२.१ टक्क्यांवर घसरले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

२०२२ मध्ये तिसरीच्या वर्गातील सर्वेक्षण केलेल्या मुलांपैकी केवळ २६.६ टक्के मुले दुसरीच्या मजकूर वाचू शकतात.
हे प्रमाण २०१८ मध्ये ४२.१ टक्के आणि २०१७ मध्ये ४०.६ टक्के होते.
२०२२ मध्ये दुसरीमधील केवळ १८.७ टक्के मुले मूलभूत वजाबाकी करू शकतात.
२०१८ मध्ये हे प्रमाण २७.१ टक्के होते. अहवालात सर्वेक्षण केलेल्या उच्च वर्गांसाठी म्हणजे पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची स्थिती हीच आहे.
इयत्ता पाचवीतील केवळ ५५.५ टक्के मुले दुसरीतील मजकूर वाचू शकतात.
तर इयत्ता आठवी मधील केवळ ७६.१ टक्के मुले इयत्ता दुसरीच्या स्तरावरील मजकूर वाचू शकतात.

 

कोरोना महामारीनंतर शालेय शिक्षणात डिजिटलायझेशनची नवी लाट असतानाही, ASER अहवालात संगणक असलेल्या शाळांच्या संख्येत घट झाली आहे.
तर ज्या शाळांमध्ये मुले संगणक वापरत असल्याचे निरीक्षण केले जाते त्यांची टक्केवारी खूपच कमी आहे.
सन २०२२ मध्ये, ३४.० टक्के शाळांमध्ये संगणक आहेत तर २०१८ मध्ये ही आकडेवारी ४५.५ टक्के होती.
परंतु संगणक वापरत असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी दोन्ही वर्षांमध्ये १९ टक्के इतकीच राहिली आहे.
(State Education Quality Index )

 

मोबाईल फोन असणाऱ्या कुटुंबांची संख्या २०१८ मध्ये केवळ ६७.५ टक्के होती.
ती आता २०२२ मध्ये ९५.१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यापैकी ८४.१ टक्के कुटुंबांकडे मोबाईल फोन आहेत.
स्मार्टफोन तर ८८.१ टक्के लोकांकडे इंटरनेट सुविधा आहे.
यामध्ये लहान मुलांकडून मोबाईल फोनचा सर्वाधिक वापर होताना दिसत आहे.
त्यामुळे कोरोना काळानंतर राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- State Education Quality Index | aser conducted suvery over educational quality of maharashtra know the horrible situation

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

Aurangabad Crime News | वाळू माफियांकडून पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलीस गंभीर जखमी

Maharashtra Prison Department | ‘महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत यासाठी प्रयत्नशील’ – अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता

 

Related Posts