IMPIMP

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

by nagesh
Pune Cyber Crime News | He sent the money thinking that his sister in America was in trouble; One and a half lakhs stolen by cyber thieves

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Cyber Crime News | गॅस संपल्यानंतर नवीन सिलेंडरला रेग्युलेटर अनेकदा बसत नाही. तेव्हा गॅस सिलेंडर वितरकाला फोन करतो, त्यांचा माणूस येऊन बसवून देतो. पण एका ज्येष्ठ नागरिक महिलेने एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर गुगलला सर्च केला. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार वागली आणि तब्बल ५ लाख ७३ हजार रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा (Fraud Case) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी भांडारकर रोडवर राहणार्‍या एका ६४ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता घडला. (Pune Cyber Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील गॅस सकाळी संपला. नवीन सिलेंडरला रेग्युलेटर बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुगलवर एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन त्यावर संपर्क केला. त्याला रेग्युलेटरबाबत सांगितल्याने त्याने मोबाईलवर क्वीक हेल्प अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यामध्ये त्यांना सर्व माहिती भरायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी बँकेसह सर्व माहिती भरली. त्यानंतर त्यांना त्या चोरट्याने २५ रुपये पाठविण्यास सांगितले. ते पैसे पाठविल्यावर तंत्रज्ञ येऊन तुम्हाला काम करुन देईन, काही पैसे असेल तर ते सांगेल, असे सायबर चोरट्याने सांगितले.

 

तेव्हा त्यांना अशा प्रकारे फसवणूक होत असल्याची लक्षात आले.
त्याने हिंदीतूनच त्यांना अशी फसवणूक होत असल्याची आम्हाला माहिती आहे.
तुम्हाला एच पीची २५ रुपयांची पावती मिळेल, असे सांगितल्यावर त्यांनी त्यांनी एकीकडे फोनवर बोलत
असतानाच २५ रुपये ट्रान्सफर केले. त्या पाठोपाठ त्यांच्या मोबाईलवर एका पाठोपाठ मेसेज येण्यास सुरुवात झाली.
त्यांनी ते पाहिल्यावर आपली फसवणुक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तातडीने बँकेला फोन करुन बँक खाते गोठविण्यास सांगितले.
तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ५ लाख ७३ हजार ८०७ रुपये काढून घेत संपूर्ण खाते रिकामे केले होते.
पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Cyber Crime News | Gas regulator doesn’t fit, 6 lakhs to consult customer care on Google, senior woman cheated by cyber thieves

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime News | वाळू माफियांकडून पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलीस गंभीर जखमी

Aurangabad Crime News | मित्रासोबत फोनवर बोलत राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra Prison Department | ‘महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत यासाठी प्रयत्नशील’ – अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता

 

Related Posts