IMPIMP

Aurangabad Crime News | वाळू माफियांकडून पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलीस गंभीर जखमी

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन  Aurangabad Crime News | पूर्णा नदीपात्रातून (Purna River) अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर (Sand Mafia) कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे घडली आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर (Aurangabad Crime News) झाला असून, त्यांच्या उजव्या पायावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद ग्रामीण (Aurangabad Rural) भागात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतूक वाढली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, चिंचोली लिंबाजी येथील पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास वाळू भरून एक ट्रॅक्टर जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर असलेल्या नवीन बस्थानकाकडे येत होता.

 

त्यावेळी रात्र गस्तीवर असलेले पिशोर पोलीस ठाण्याचे (Pishore Police Station)
पोलीस कॉन्स्टेबल वसंत पाटील (Police Constable Vasant Patil), एस.आर. भिवसने (S.R. Bhivasane),
अन्सार पटेल (Ansar Patel), वाहन चालक सुनील जाधव (Driver Sunil Jadhav) यांच्या निदर्शनास ही
बाब आली. त्यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करुन ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले.
मात्र ट्रॅक्टर चालकाने सोमोरुन आलेले पोलीस कॉनस्टेबल सुनील जाधव यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 

या घटनेत सुनील जाधव यांच्या पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
तर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घटनास्थळी सोडून पसार झाला आहे. बुधवारी (दि.17) पोलिसांनी
ट्रॅक्टर मालक बाळू पवार, चालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Aurangabad Crime News | an attempt by the sand mafia to put a tractor on the police incidents in aurangabad district crime news

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime News | मित्रासोबत फोनवर बोलत राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra Prison Department | ‘महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत यासाठी प्रयत्नशील’ – अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता

 

Related Posts