IMPIMP

Sudhir Suri | शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, एका संशयित हल्लेखोराला अटक

by nagesh
Sudhir Suri | shivsena leader sudhir suri shot in amritsar by unknown persons

अमृतसर : वृत्तसंस्था – पंजाबमधील शिवसेना (Shivsena) नेते सुधीर सुरी (Sudhir Suri) यांची अमृतसरमध्ये गोळ्या झाडून हत्या (Shot Dead) करण्यात आली. अमृतसरमधील मजिठा रोडवरील गोपाळ मंदिराबाहेर (Gopal Mandir, Amritsar) ही घटना घडली, ज्यामध्ये सुधीर सुरी (Sudhir Suri) यांना दोन गोळ्या लागल्या. या घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे अमृतसर पोलिसांनी सांगितले. शिवसेना नेते सुधीर सुरी गोपाळ मंदिराबाहेर कचरा टाकून आंदोलन (Agitation) करत होते. त्यावेळी सुधीर सुरी यांच्यावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला, त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक करुन पिस्टल जप्त केले आहे. संदीप असे त्याचे नाव आहे. दुसरा हल्लेखोर पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सुधीर सुरी (Sudhir Suri) हे पंजाबमधील अमृतसर येथे आज गोपाळ मंदिर परिसरात कचऱ्यात देवाची मुर्ती आढळल्याने निदर्शने करत होते. त्यावेळी गर्दी मधील दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गुरुवारी शिवसेना नेते अश्विनी चोप्रा (Shiv Sena leader Ashwini Chopra) यांच्यावर देखील गोळीबार (Firing) करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना आखण्यात येत होती.
त्यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला होता.
पंजाबमध्ये एसटीएफ (STF) आणि अमृतसर पोलिसांनी (Amritsar Police) एकत्र कारवाई करत महिन्याभरात चार गँगस्टरला अटक केली होती.
या आरोपींची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक माहितीचा खुलासा झाला होता.

 

Web Title :- Sudhir Suri | shivsena leader sudhir suri shot in amritsar by unknown persons

 

हे देखील वाचा :

Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना पुण्यातून अटक, नांदेड अ‍ॅन्टीकरप्शनची कारवाई; गगराणींसह त्यांची पत्नी व मुलाविरूध्द अपसंपदेचा गुन्हा

Sambhaji Bhide | पुण्यात संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन, तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा

Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested | सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना पुण्यातून अटक, नांदेड अ‍ॅन्टीकरप्शनची कोथरूड-कर्वेनगर परिसरात कारवाई

 

Related Posts