पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Retired Addl Collector R. L. Gagrani Arrested | सेवानिवृतत अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी (Ramnarayan Laxminarayan Gagrani) (रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी) वय -65, रा. शारदानगर, नांदेड यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Nanded ACB Trap) आज (शुक्रवारी) पुण्यातील कोथरूड-कर्वेनगर परिसरातून अटक (Arrest) केली आहे. गगराणी यांच्याविरूध्द नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलिस ठाण्यात (Wazirabad Police Station) अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल आहे. त्या गुन्हयात गगराणी यांना अटक करण्यात आली आहे. गगराणी यांना पुण्याच्या कर्वेनगर (Karve Nagar, Pune) परिसरातून पथकाने नांदेड अॅन्टी करप्शनच्या टीमने ताब्यात घेतले. याबाबत नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde) यांच्याशी पोलीसनामाने (https://policenama.com) संपर्क साधला असता त्यांनी सदरील वृत्तास दुजोरा दिला आहे. (Retired Addl Collector R. L. Gagrani Arrested)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
आर.एल. गगराणी यांच्यावर वजीराबाद पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गगराणी यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 28 लाख 72 हजार 660 रुपयांची (45 टक्के) अधिक संपत्ती बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गगराणी हे पुण्यातील कर्वेनगर परिसरात त्यांच्या जावयाकडे रहावयास आल्याची माहिती नांदेडच्या अॅन्टी करप्शनच्या पथकास (Nanded Anti Corruption Bureau) मिळाली. त्यानंतर नांदेड एसीबीच्या पथकाने पुण्यातील कर्वेनगर परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. गगराणी यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अपसंपदा बाळगल्याप्रकरणी आर.एल. गगराणी यांच्यासह पत्नी जयश्री रामनारायण गगराणी Jayashree Ramnarayan Gagrani (वय 57) मुलगा प्रथमेश रामनारायण गगराणी Prathamesh Ramnarayan Gagrani (वय 34 सर्व रा. शारदानगर नांदेड) यांच्यावर वजीराबाद पोलिस ठाण्यात कलम 13(1)(ई) सह 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (Prevention of Corruption Act) 1988 आणि कलम 109 आयपसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत नांदेड एसीबीचे पोलीस उपाधीक्षक राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil) यांनी तक्रार दिली आहे. हा गुन्हा 1 मार्च 2010 ते 30 जून 2016 या कालावधीत घडला आहे. (Retired Addl Collector R.L. Gagrani Arrested)
दरम्यान, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी आर.एल. गगराणी यांना अपसंपदा बाळगल्याप्रकरणी अॅन्टी करप्शनच्या पथकाकडून अटक झाल्याने राज्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही कारवाई नांदेड एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे,
अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण (Addl SP Dharam Singh Chavan)
यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड एसीबीच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर (DySP Ashok Ipper) करीत आहेत.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Retired Additional Collector R.L. Gagrani arrested from Pune, Nanded anti-corruption action in Kothrud-Karvenagar area of pune
Pune Pimpri Crime | गुंडाच्या खूनाचा बदला घेण्याचे स्टेटस ठेवणारे गुन्हेगार ‘गोत्यात’
CCL | सीसीएलकडून पुण्यामध्ये वनस्पती-आधारित मांस उत्पादनांची श्रेणी लॉन्च