IMPIMP

Sushma Andhare | शिवसेना-वंचित संभाव्य युतीच्या आधीच नेत्यांमध्ये टीका-टिपण्णी, सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, म्हणाल्या – मी काय फडणवीस किंवा…

by nagesh
Sushma Andhare | thackeray camp leader sushma andhare hits back over vba chief prakash ambedkar statement

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारणा केल्यास आगामी निवडणुकीत युती करू, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केले होते. मात्र, या संभाव्य युतीच्या आधीच प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यात जुंपली आहे. ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेतील भाषणामुळे अंधारे यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल होता, यावर आंबेडकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले की, कोण या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना मी ओळखत नाही. चळवळीच्या ठिकाणी माझी त्यांच्याशी भेट झाली असे मला वाटत नाही. आंबेडकरांच्या या टीकेवर आता सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आंबेडकर यांना टोला लगावताना म्हटले की, प्रकाश आंबेडकर मला ओळखत नाही असे विधान केल्याने काही भावंडांना थोडसे वाईट वाटले आणि ते चिडून काहीबाही लिहीत आहेत. पण मला वाटते आपण चिडू नये. कदाचित नसतील ते ओळखत काय हरकत आहे? मला त्यांनी ओळखावे यासाठी मी काही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाही किंवा आरएसएसचा (RSS) फार मोठा पदाधिकारी नाही, किंवा कुणी मुख्यमंत्री अथवा या देशाचा पंतप्रधान नाही किंवा मी फार कुणी मोठी अब्जाधीश व्यक्ती नाही किंवा मला फार मोठा भव्य दिव्य काही राजकीय वारसाही नाही.

 

अंधारे पुढे म्हणाल्या की, मी दुर्गम पहाडी भागातील ’वंचित’ घटकातील आहे. तेव्हा माझ्यासारख्या वंचितांची ओळख त्यांना असावी हे अपेक्षितही नाही.
पण मी त्यांना ओळखते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या नावातील आंबेडकर नाव हे त्यांच्या नावाशी जोडलेले आहे.
त्यामुळे मी त्यांना निश्चितच ओळखते. त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना जशी प्रत्येक वाढदिवसाला करते तशीच आजही करते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना प्रकाश आंबेडकर यांनी युतीचा प्रस्ताव दिला आहे.
मात्र, या संभाव्य युतीच्या आधीच आंबेडकर आणि शिवसेनेच्या उपनेत्यांमध्ये वाद रंगला आहे.

 

Web Title :- Sushma Andhare | thackeray camp leader sushma andhare hits back over vba chief prakash ambedkar statement

 

हे देखील वाचा :

Andheri By Election | अंधेरीत शिवसेनेचा विजय सोपा, अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे

Pune Crime | वाहतूक पोलिसाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडणाऱ्या तरुणाला अटक

Maharashtra Politics | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका, एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा…

 

Related Posts