IMPIMP

Andheri By Election | अंधेरीत शिवसेनेचा विजय सोपा, अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे

by nagesh
Andheri By Election | mumbai andheri east vidhansabha bypoll shivsena uddhav thackeray rutuja latke victory bjp muraji patel withdraws candidature

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात गेला आठवडा अंधेरी पोटनिवडणुकीचे (Andheri By Election) राजकारण सुरु आहे. त्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप-शिंदे गट यांच्यात चुरस सुरु आहे. आता भाजपने (BJP) ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक (Andheri By Election) आता बिनविरोध होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंधेरी पूर्वची (Andheri By Election) ही जागा शिवसेनेची होती. या ठिकाणी शिवसेनेचे रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latke) हे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक होणार होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena Uddhav Balasaheb Thackeray गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपने मुरजी पटेल या स्थानिक पुढाऱ्याला उमेदवारी दिली होती. अखेर त्यांनी आता माघार घेतली आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन सर्व पक्षांना केले होते. त्यामुळे अखेर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आहे.

 

काँग्रेस महाराष्ट्र कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मात्र या घडामोडीवर आक्षेप घेतला आहे.
मुंबईत एमसीएच्या (मुंबई क्रिकेट असोशिएशन) Mumbai Cricket Association निवडणुका होणार आहेत.
त्याचमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला होता.
या मागणीला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकांचा वास येतो आहे,
असे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
तसेच या प्रकरणांत त्यांनी शरद पवार आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मध्ये घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Andheri By Election | mumbai andheri east vidhansabha bypoll shivsena uddhav thackeray rutuja latke victory bjp muraji patel withdraws candidature

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वाहतूक पोलिसाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडणाऱ्या तरुणाला अटक

Maharashtra Politics | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका, एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा…

Ajit Pawar | अजित पवारांचेच आमदार संध्याकाळी आमच्याकडे येऊन बसतात, मग आम्ही त्यांना विचारतो, आमच्याकडे येण्याचे…., शिंदे गटाचे राजकारण

 

Related Posts