IMPIMP

Ved Movie | ‘वेड’ चित्रपट आता नव्या रुपात; चित्रपटामध्ये करण्यात आले ‘हे’ बदल

by nagesh
Ved Movie | Ved movie now in a new form; 'These' changes were made in the film

सरकारसत्ता ऑनलाईन  – Ved Movie | बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. (Ved Movie)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वेड या चित्रपटामधील वेड लागलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता वेड या चित्रपटाच्या टीमने “वेड” चित्रपटाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. रितेशने एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत प्रेक्षकांना सांगितले आहे. (Ved Movie)

 

 

 

रितेश देशमुख याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन वेड चित्रपटाच्या नवीन व्हर्जनबाबत सांगितलं.
तो म्हणाला की, “वेड या चित्रपटाला तुम्ही सर्वांनी भरभरुन प्रेम दिल्याबद्दल मी आणि टीम ‘वेड’ तुमचे आभार मानतो.
वेड चित्रपटाच्या प्रमोशन करतेवेळी अनेकांनी आम्हाला विचारलं की,
सत्या आणि श्रावणी यांचे रोमँटिक गाणं कुठं आहे? त्यामुळे आम्हाला वाटलं की,
अजूनही वेळ गेली नाही आपण नवीन गाणं रेकॉर्ड करुन चित्रपटात वापरु शकतो.
त्यामुळे आता हॅप्पीली एव्हर अफ्टरनंतर सत्या आणि श्रावणीच नवीन गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रपटात याआधी ” वेड तुझे ” हे गाणं रितेश देशमुख आणि जिया शंकर वर चित्रित करण्यात आलं होत.
आता आम्ही वेड तुझे हे गाणं सत्या आणि श्रावणीवर शूट केलं आहे.
तुमच्या आवडत्या पात्रांचं हे गाणं तुम्हाला 20 तारखेपासून चित्रपगृहात पाहता येणार आहे.
“त्यामुळे 20 जानेवारीपासून तुम्ही वेड या चित्रपटाचं एक्सटेंडेट व्हर्जन चित्रपट गृहात पाहू शकता.”
शुक्रवारी सिनेमा लव्हर्स-डे आहे. यानिमित्ताने तुम्ही 99 रुपयांमध्ये “वेड” चित्रपट पाहू शकता.
‘ वेड या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

 

Web Title :- Ved Movie | Ved movie now in a new form; ‘These’ changes were made in the film

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘मागची २५ वर्षे ज्यांनी मुंबईला खड्ड्यात घालण्याचं काम केलं तेच आज…; शिंदे गटाची ठाकरे गटावर सडकून टीका

State Education Quality Index | राज्याची शैक्षणिक गुणवत्ता खालावली; ‘पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांना येईना वजाबाकी, भागाकार…’

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

 

Related Posts