IMPIMP

Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने केले ‘कंगाल’, सातत्याने लागत आहे लोअर सर्किट

by nagesh
Tata Group Share | shares of tata group company are amazing one lakh rupees have become 55 lakhs

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाटाटा ग्रुपची (Tata Group) उपकंपनी टीटीएमएलच्या शेयरनी (TTML Share) गेल्या 5 सत्रांमध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना वेठीस धरले आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिसर्‍या तिमाहीत कंपनीने 302 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवल्यानंतर यात दररोज लोअर सर्किट लागत आहे. वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत 298 कोटींचा तोटा झाला होता. आजही या स्टॉकमध्ये विक्रीसाठी 31,71,285 शेयर ऑर्डरमध्ये आहेत आणि एकही खरेदीदार सापडलेला नाही. (Tata Group)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

11 जानेवारी रोजी टीटीएमएलचा शेयर 290.15 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला होता. याआधी, त्याने एका वर्षात 2830 टक्के इतका रिटर्न दिला होता. आज, 5 टक्के लोअर सर्किटनंतर, तो प्रति शेअर 147.35 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

 

यापूर्वी, TTML 11 फेब्रुवारी रोजी NSE वर 155.10 वर बंद झाला होता. तो 10 फेब्रुवारीला 163.25 रुपये, 9 फेब्रुवारीला 171.80 रुपये आणि 8 फेब्रुवारीला 180.80 रुपयांवर बंद झाला. (Tata Group)

 

23 डिसेंबरपासून त्यास जवळजवळ दररोज अप्पर सर्किट लागत होते. 23 डिसेंबरला तो 154.10 रुपयांवर बंद झाला आणि 10 जानेवारीला 290.15 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत गुंतवणूकदारांना 188 टक्के रिटर्न मिळाला.

 

शेयरचा भाव वाढल्यानंतर तो अचानक पुन्हा घसरू लागला, कारण गेल्या काही दिवसांत टाटा टेलिसर्व्हिसेस लि. ने समायोजित सकल महसूल (एजीआर) थकबाकीवरील व्याज इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याची त्यांची योजना रद्द केली आहे. अलीकडेच, टाटा टेलिसर्व्हिसेसने (Tata Teleservices) सरकारला द्यायची 850 कोटी रुपयांची व्याज देय रक्कम इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता, जी कंपनीच्या 9.5 टक्के भागीदारीच्या समतुल्य आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मात्र, आता कंपनीने हा प्लॅन रद्द केला आहे. तेव्हापासून टीटीएमएलमध्ये दररोज अप्पर सर्किट होत आहे. गेल्या आठवड्यात या कंपनीचे निकाल समोर आल्यानंतर पुन्हा एकदा लोअर सर्किटचे सत्र सुरू झाले आहे.

 

TTML काय करते ?
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे.
कंपनी व्हॉईस डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत.
बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली आहे.

कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा मिळत असल्याने याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
क्लाउड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे डेटा सुरक्षित ठेवता येतो.

जे व्यवसाय डिजिटल तत्त्वावर चालत आहेत, त्यांना ही लीज लाइन खूप मदत करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षितता अंतर्भूत करण्यात आली असून, त्यासोबतच वेगवान इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.

 

Web Title :- Tata Group | tata group company ttml has drains investors money lower circuit continue

 

हे देखील वाचा :

Post Office Transaction Rules | पोस्ट ऑफिसमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रांजक्शनसाठी द्यावी लागतील ‘ही’ कागदपत्रं, जाणून घ्या सविस्तर

Eggs Health Benefits | चाळीशीनंतर अंडे खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 10 मिनिटात टाटा समुहाच्या 2 शेयरमधून कमावले 186 कोटी, जाणून घ्या कसे

 

Related Posts