IMPIMP

Tata Group चा ‘हा’ शेयर पुन्हा घेऊ लागला उसळी !

by nagesh
Tata Group | tata group stocks global brokerage jefferies buy call on tata consumer products on strong business outlook check target price and expected return

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Tata Group ची उपकंपनी टीटीएमएलचे शेअर्स (TTML Share) गेल्या 5 सत्रांपासून अपर सर्किटमध्ये आहेत. दुसरीकडे, या आधी 20 दिवस खरेदीदार मिळत नव्हते. शेअर 290.15 रुपयांवरून 141.75 रुपयांवर घसरला होता. आता पुन्हा एकदा हा स्टॉक वाढू लागला आहे आणि NSE वर तो रु. 164.00 वर पोहोचला आहे. त्याच वेळी, त्याची BSE वर किंमत आता 172.70 रुपये झाली आहे. (Tata Group)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

11 जानेवारीपासून तो सतत लोअर सर्किटवर होता आणि या काळात कोणीही या शेअरमध्ये पैसे गुंतवायला तयार नव्हते आणि खरेदीदार नसल्यामुळे लोकांचे नुकसान थांबवता आले नाही. पण, एका बातमीनंतर, बाजार उघडताच, TTML ला अप्पर सर्किट लागले.

 

TTML चा स्टॉक 11 जानेवारी रोजी 290.15 च्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. याआधी, एका वर्षात 2830 टक्के इतका रिटर्न दिला होता.

 

23 डिसेंबरपासून तो जवळजवळ दररोज अप्पर सर्किटला धडकत होता. 23 डिसेंबरला तो 154.10 रुपयांवर बंद झाला आणि 10 जानेवारीला 290.15 रुपयांवर पोहोचला. या कालावधीत गुंतवणूकदारांना 188 टक्के रिटर्न दिला. (Tata Group)

अचानक भाव का वाढू लागला
मंगळवारी टाटा टेलिसर्व्हिसेस लि. (TTSL) ने समायोजित सकल महसूल (एजीआर) थकबाकीवरील व्याज इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याची त्यांची योजना रद्द केली. अलीकडेच, टाटा टेलिसर्व्हिसेसने सरकारला द्यायची 850 कोटी रुपयांची व्याज देय रक्कम इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता, जी कंपनीतील 9.5 टक्के समभाग समतुल्य आहे. मात्र, आता कंपनीने हा प्लॅन रद्द केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

का लागत होते लोअर सर्किट?
टाटा टेलिसर्व्हिसेसने शेअर बाजाराला नुकत्याच दिलेल्या माहितीत म्हटले होते की, त्यांच्या मूल्यांकनानुसार, व्याजाचे निव्वळ वर्तमान मूल्य (NPV) सुमारे 850 कोटी रुपये आहे. व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर केल्यास कंपनीतील सरकारचा हिस्सा 9.5 टक्के होईल.

 

दूर संचार विभागाने दिलेल्या माहितीतील गणना पद्धतीनुसार, 14 ऑगस्ट 2021 च्या प्रासंगिक तारखेनुसार कंपनीची सरासरी शेअर किंमत प्रति इक्विटी अंदाजे 41.50 रुपये आहे. तेव्हापासून या फ्लाईंग स्टॉकमध्ये विक्रीचा टप्पा सुरू झाला होता.

काय करते TTML?
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे.
कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत.
बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा कंपन्यांसाठी सुरू केली आहे.

 

याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, कारण कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइज्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा मिळत आहेत.
क्लाउड आधारित सुरक्षा हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे डेटा सुरक्षित ठेवता येतो.

 

जे व्यवसाय डिजिटल आधारावर चालत आहेत त्यांना या लीज लाइनमुळे मोठी मदत होणार आहे.
यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षितता अंतर्भूत करण्यात आली असून, त्यासोबतच वेगवान इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Group | ttml share of tata group started flying again

 

हे देखील वाचा :

Personal Finance | अवघे 3,000 रुपये वाचवून सुद्धा बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे कॅलक्युलेशन

TET Exam Scam | TET घोटाळ्यात कारवाई ! पैसे भरून शिक्षक झालेल्या 7,800 जणांची यादी तयार; बोगस शिक्षकांवर कारवाईची शक्यता

Maharashtra Crime News | दहा दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

 

Related Posts