IMPIMP

Shinde Fadnavis Govt | उच्च न्यायालयाचा शिंदे फडणवीस सरकारला दणका; ‘या’ निर्णयाला दिली स्थगिती

by nagesh
Shinde Fadnavis Govt | stay of high court on shinde fadnavis government decision to cancel work orders of mva government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadanvis Govt) आल्यानंतर नव्या सरकारने घेतलेला सर्वात पहिला निर्णय म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या अनेक कामांना स्थगिती. १ एप्रिल २०२१ पासून पुढे मंजूर झालेल्या सर्व कामांना शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadanvis Govt) स्थगिती दिली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्कऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

 

उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadanvis Govt) एक प्रकारे मोठा दणका दिला आहे.
महाविकास आघाडीच्या काळात मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) निघालेल्या कामांना शिंदे फडणवीस सरकारनं स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
तसेच, शिंदे फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर ग्रामविकास विभागाने 19 जुलै आणि 25 जुलै 2022
दरम्यान महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या आणि वर्कऑर्डर निघालेल्या कामांनाही स्थगिती दिली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात काही ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
संबंधित कामांना निधी मंजूर झाला असताना आणि सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली असताना अशी कामे थांबवता
येत नाहीत, असे मत उच्च न्यायालयाने मांडले. याप्रकरणी पुढील सुनावणी 12 डिसेंबर रोजी होईल.

 

 

Web Title :- Shinde Fadnavis Govt | stay of high court on shinde fadnavis government decision to cancel work orders of mva government

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | खारमध्ये डिलिव्हरी बॉयने घरात घुसत केला महिलेचा विनयभंग

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

Jitendra Awhad | ‘मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच उभा राहतो, म्हणजे पोलीस पाकीटमारीचा गुन्हा दाखल करतील’ – जितेंद्र आव्हाड

 

Related Posts