IMPIMP

Uday Samant | कार्यक्षम सरकार आल्यानंतर कशाप्रकारे कार्यवाही होते, हे आमच्या सरकारने दाखवून दिले – उदय सामंत

by nagesh
Uday Samant | uday samant visits sangli jath 42 villages who warns to go into karnataka over water issue

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन   उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांना हात घालत भाषण केले. कार्यक्षम सरकार आल्यानंतर कशा प्रकारे कार्यवाही होते, हे आमच्या सरकारने दाखवून दिले, असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाच्या कबरीच्याभोवती अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. ते पाडण्यात यावे, अशी अनेक शिवप्रेमींची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ते काम आमच्या सरकारने केले आहे. त्यामुळे कार्यक्षम सरकार आल्यावर कशाप्रकारे कामे होतात, याचे उदाहरण आमचे सरकार आहे, असे उदय सामंत (Uday Samant) यावेळी म्हणाले. आमच्या सरकारमुळे महाराष्ट्रातील लघु उद्योजकांमध्ये ताकद आली आहे. उदयोग खाते जलद गतीने वाटचाल करत आहे. गेले दोन वर्षे राज्यातील उद्योग स्तब्ध होते. ते का होते, त्यावर मी बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता. उपमुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता. कोणी उद्योजकांच्या भेटी घेत नव्हते. त्यामुळे कदाचित उद्योजक नाराज असतील. त्यामुळे आता उद्योजक गेल्याने ते लोक बोंबाबोंब करत आहेत. आता आमचे सरकार आले आहे. आम्ही त्यांना अनुकूल परिस्थिती आणि अनुदान दिले आहे. त्यामुळे भविष्यात पुढील वर्षात आम्हाला 25 हजार नवे उद्योजक तयार करायचे आहेत, असे देखील सामंत म्हणाले.

 

उद्योगासाठी काम करताना राजकारण बाजुला ठेऊन केवळ राज्याच्या दृष्टीने काम केले आहे.
उद्योगांच्या बाबतीत कोणीही राजकारण करु नये, असे देखील उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

 

 

Web Title :- Uday Samant | Our government has shown how action takes place after an efficient government

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे?, जयंत पाटलांचा सवाल

Kailash Gorantyal | अब्दुल सत्तार मतिमंद आहेत, त्याला मतिमंदांच्या शाळेत पाठवा – कैलास गोरंट्याल

Sushma Andhare | सुषमा अंधारेंना वाटते देवेंद्र फडणवीसांची काळजी; “म्हणाल्या त्यांनी थोडा ताण….”

Jitendra Awhad | “भावनिक ब्लॅकमेल करण्याची गरज नाही…”; मनसेचा आव्हाडांना सल्ला

 

Related Posts