IMPIMP

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे?, जयंत पाटलांचा सवाल

by nagesh
Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President's rule, claims Jayant Patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  हर हर महादेव (Har Har Mahadev) या मराठी चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना आज (शुक्रवार) अटक (Arrest) करण्यात आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील (Vivian Mall) सिनेमागृहात सोमवारी रात्री दहा वाजता या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले. यावेळी चित्रपटगृहात एका व्यक्तीला बेदम मारहाण (Beating) झाली होती. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा (Crime) केला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) बदनामीच्या विरोधात लढणे, हा आजच्या महाराष्ट्रात गुन्हा झाला आहे, असं जयंत पाटील यांनी ट्विट केलं आहे.

 

 

जयंत पाटील म्हणाले, जितेंद्र आव्हाड आणि काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जो सिनेमा प्रदर्शित झाला आहे त्या ‘हर हर महादेव’ मध्ये इतिहासाची मोडतोड करुन, दाखवण्याचं काम झालं त्याचा निषेध व्यक्त केला. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा असणाऱ्या माणसाला विचारलं, तर तो हे कधीच सहन करणार नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि महाराष्ट्रातील अनेक लोक हळूहळू पुढे येत आहेत, ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने यात दिसत नाही. उलट सरकारने (Government) सिनेमा तयार
करताना यामध्ये इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्याना जाब विचारण्या ऐवजी याबाबत निषेध व्यक्त करणाऱ्यांनाच
अटक करण्याचं काम सरकार करत आहे. महाराष्ट्रातून आता हा सिनेमा जवळपास सगळीकडून बाहेर गेलेला आहे.
तो कुठे दखवू शकतील असं मला वाटत नाही.
सगळीकडे लोकांच्या मनात संताप आहे. जितेंद्र आव्हाडांनी खरंतर गुन्हाच केलेला नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

 

 

Web Title :- Jitendra Awhad | ncps first reaction to jitendra awhads arrest state president jayant patil said

 

हे देखील वाचा :

Kailash Gorantyal | अब्दुल सत्तार मतिमंद आहेत, त्याला मतिमंदांच्या शाळेत पाठवा – कैलास गोरंट्याल

Jitendra Awhad | “जामीन पण करणार नाही…”; जितेंद्र आव्हाड कडाडले

Sushma Andhare | सुषमा अंधारेंना वाटते देवेंद्र फडणवीसांची काळजी; “म्हणाल्या त्यांनी थोडा ताण….”

 

Related Posts