IMPIMP

Pune Crime News | नेमक काय घडलं की ACP भारत गायकवाड यांनी पत्नी अन् पुतण्याला घातल्या गोळया; स्वतः केली आत्महत्या

सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ACP गायकवाड यांच्या बेडरुममधून…

by nagesh
une Crime News |what exactly happened was that acp bharat gaikwad shot his wife and nephew committed suicide

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पोलीस दलातून एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे.
अमरावती येथे सहायक पोलीस आयुक्त (Amravati ACP Suicide In Pune) असलेल्या पोलीस अधिकार्‍याने आपली
पत्नी आणि पुतण्यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला (Firing In Pune). त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेऊन
आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

भारत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) असे या सहायक पोलीस आयुक्तांचे नाव आहे.
मोनी भारत गायकवाड Moni Bharat Gaikwad (वय 44) आणि दीपक गायकवाड Deepak Gaikwad (वय 35) अशी
खून केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे सध्या अमरवती येथे राजापेठ येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. गेल्या शनिवारी ते पुण्यात सुट्टीवर आले.
त्यांचे कुटुंबीय पुण्यात बालेवाडी येथील लक्ष्मणनगरात (Laxman Nagar, Balewadi) वास्तव्याला आहेत.
घरी त्यांची पत्नी, पुतण्या, आई, दोन मुले असा परिवार एकत्र राहतो. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

गेले आठ दिवस ते पुण्यातच होते. त्यांच्या एका मुलाचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला असून दुसराही त्याच क्षेत्रामध्ये आहे.
सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गायकवाड यांच्या बेडरुममधून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने बाहेर झोपलेले
पुतणे दीपक व गायकवाड यांचा मुलगा उठला. गायकवाड यांचे बेडरुम आतून बंद होते. दरवाजा ठोठावला तरी त्यांनी तो
न उघडल्याने शेवटी पुतण्या आणि मुलाने दुसर्‍या चावीने दरवाजा उघडला. तेव्हा एसीपी गायकवाड यांच्या हातात
पिस्तुल पाहून दीपक याने ते काढून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यात गोळी फायर होऊन ती दीपक यांना लागली. त्यानंतर ते स्वत:वर गोळी घालून घेत होते.
हे पाहून त्यांचा मुलाने त्यांना असे काही न करण्याविषयी विनवणी केली.
परंतु, त्यांनी तू बाहेर निघ, नाही तर तुलाही गोळी घालेल, असे म्हणून त्याला बाहेर ढकलून दरवाजा बंद केला व
स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेची माहिती मुलाने पोलिसांना कळविली. पाठोपाठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तोपर्यंत तिघांचाही मृत्यु झाला होता. गायकवाड यांनी नेमके कोणत्या कारणामुळे हे कृत्य केले हे अद्याप समोर आलेले नाही.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Sr PI Balaji Pandhre) यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

 

Web Title : Pune Crime News |what exactly happened was that acp bharat gaikwad shot his wife and nephew committed suicide

हे देखील वाचा

Related Posts