IMPIMP

Pune Crime News | ब्राम्हण महिलांविषयी वादग्रस्त पोस्ट करणार्‍या पत्रकारावर पुण्यात गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | a case has been registered in pune against a journalist mukesh machkar who posted a controversial post about brahmin women

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मणीपूरमधील महिलांविषयीच्या अत्याचाराबाबत (Manipur Violence ) फेसबुकवर पोस्ट (Facebook Post) करताना ब्राम्हण महिलांविषयी (Brahmin Women) वादग्रस्त पोस्ट (Controversial Post) केल्याने एका पत्रकारावर (Journalist) पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मुकेश माचकर (Journalist Mukesh Machkar) असे या पत्रकाराचे नाव आहे. याबाबत एरंडवणे येथील एका 35 वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३१/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या फेसबुकवर सर्फिग करीत असताना मुकेश माचकर याच्या फेसबुक प्रोफाईलवरुन ब्राम्हण महिलांबाबत वादग्रस्त पोस्ट दिसून आली. त्यामुळे विविध धर्मातील जातींमध्ये शत्रुत्व वाढून, एकोपा बिघडविण्यास तसेच वर्गावर्गामध्ये द्वेषभावना निर्माण करुन वशिष्ट वर्गाच्या महिलांची बदनामी होईल, अशी पोस्ट केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संगिता पाटील (PI Sangeeta Patil) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime News | a case has been registered in pune against a journalist mukesh machkar who posted a controversial post about brahmin women

हे देखील वाचा

Related Posts