IMPIMP

Universal Pension Income | निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार; केंद्र सरकार लवकर एक चांगला निर्णय घेणार

by nagesh
PM Narendra Modi | conspiracy to assassinate pm narendra modi by underworld don dawood henchmen unknown audio message on mumbai traffic police mobile

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाUniversal Pension Income | केंद्र सरकार (Central Government) लवकर एक चांगला निर्णय घेणार असून यामुळे सरकारी कर्मचार्‍यांना (Government Employees) फायदा होणार आहे. ही चांगली बातमी येत्या काही दिवसात सरकारी कर्मचार्‍यांना मिळू शकते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (PM Economic Advisory Committee), देशात काम करण्यासाठी लोकांची वयोमर्यादा वाढवावी, अशी सूचना केली आहे. तसेच निवृत्तीचे वय (Retirement Age) वाढवण्यासोबत युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही (Universal Pension Income) सुरू करावी, असे म्हटले आहे. याबाबतचा प्रस्ताव समितीने पाठवला आहे.

 

या प्रस्तावात, आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे.
कर्मचार्‍यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावी, असे या शिफारशीमध्ये (Universal Pension Income) म्हटले आहे.
या प्रस्तावात निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत गरज असल्याचे म्हटले आहे.
सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील (Social Security System) दबाव कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.
अहवालात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबतही मुद्दे मांडण्यात आले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अहवालात म्हटले आहे की, कौशल्य विकास (Skill Development) साधता येईल अशी धोरणे केंद्र आणि राज्य सरकारने (State Government) बनवावीत.
या प्रयत्नात असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही अशांचाही समावेश झाला पाहिजे, अशी शिफारस करण्यात आली आहे.

 

2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील, असे वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस (World Population Prospects) 2019 मध्ये नमूद करण्यात आले आहे.
याचाच अर्थ, देशातील सुमारे 19.5 टक्के लोकसंख्या निवृत्तांच्या श्रेणीत जाईल.
वर्ष 2019 मध्ये, भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे 10 टक्के किंवा 140 दशलक्ष लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.

 

Web Title :-  Universal Pension Income | universal pension income programme economic advisory committee recommend

 

हे देखील वाचा :

Nilesh Rane | शिंदेंना ट्विट करता येतं का ? म्हणणार्‍या राऊतांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले – ‘स्वत: दहावी दोनदा नापास…’

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी मानले बंडखोर आमदारांचे आभार, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले

Pune Crime | घटस्फोटाच्या केससाठी अकाऊटंटला हाताशी धरुन सासर्‍याने मिळविली जावयाच्या उत्पन्नाची माहिती

 

Related Posts