IMPIMP

UPI Activated From Aadhaar | आता लवकरच Aadhaar द्वारे करू शकता UPI अ‍ॅक्टिव्हेट, डेबिट कार्डची असणार नाही आवश्यकता

by nagesh
UPI Activated From Aadhaar | now upi will be able to be activated from aadhaar soon debit card will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाUPI Activated From Aadhaar | देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. अशावेळी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) रिटेल डिजिटल पेमेंटसाठी बँकांना विशेष सूचना दिल्या आहेत. या अंतर्गत, आता UPI सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड प्रमाणीकरण आणि नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी आवश्यक असेल. तर यापूर्वी UPI सक्रिय करण्यासाठी डेबिट कार्ड आवश्यक होते. (UPI Activated From Aadhaar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आता डेबिट कार्ड क्रमांक देण्याची गरज बंद केली आहे. यामुळे यात जास्तीत जास्त लोक सामील होतील आणि डिजिटल पेमेंटमध्ये वाढ होईल, असा विश्वास आहे. NPCI ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हे परिपत्रक जारी केले होते आणि बँकांना 15 डिसेंबर 2021 पर्यंत परिपत्रकाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले होते, जे नंतर 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आले. त्याचवेळी, ते सादर करण्यासाठी 9 ते 12 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे सांगण्यात येत आहे. (UPI Activated From Aadhaar)

 

युपीआय अ‍ॅक्टिव्ह असेल तर करावी लागणार नाही प्रक्रिया

या व्यवस्थेअंतर्गत बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. जर बँक आधारशी लिंक नसेल, तर युपीआय सक्रिय करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. दुसरीकडे, जर तुमचे युपीआय आधीच सक्रिय असेल, तर त्याला आधार पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.

 

केवळ ओटीपीद्वारे रजिस्ट्रेशन
फक्त आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाच्या मदतीने तुम्ही युपीआयमध्ये नोंदणी करू शकाल.
यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे.
लिंक केल्यानंतरच तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. लिंक नसल्यास, तुम्ही 31 मार्च 2022 पूर्वी ते पूर्ण करून घ्यावे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजूनही इतक्या लोकांकडे नाही डेबिट कार्ड
जानेवारी 2022 पर्यंत देशात 940 मिलियनपेक्षा जास्त डेबिट कार्ड आहेत.
तसेच, प्रधानमंत्री जन योजनेच्या आकडेवारीनुसार, योजनेंतर्गत बँक खाते उघडलेल्या 448.2 मिलियन ग्राहकांपैकी केवळ 314.6 मिलियन ग्राहकांना डेबिट कार्ड जारी करण्यात आले आहे.
असे अनेक ग्राहक आहेत ज्यांचे बँक खाते आहे, परंतु त्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही. डेबिट कार्ड नसल्याने त्यांचे युपीआय नाही.

 

Web Title :- UPI Activated From Aadhaar | now upi will be able to be activated from aadhaar soon debit card will not be needed

 

हे देखील वाचा :

Pune Blood Bank | मधुकर बिडकर रक्तपेढीचे लोकार्पण संपन्न; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘सत्ताधारी नगरसेवकांचे प्रकल्प लोकहिताचे’

Pune City Police | जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसासाठी घेण्यात आलेल्या ‘टॅलेंट शो’ स्पर्धेत API कल्याणी पाडोळे विजयी

Midcap Mutual Funds | रिटर्न चार्टवर बेस्ट 5 स्कीम, 10 वर्षात 6 पट मिळाला आहे रिटर्न; तुम्ही केले आहे का SIP?

 

Related Posts