IMPIMP

Vasant More | ‘सावध राहा रुपेश’ ! वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; शहरात खळबळ

by nagesh
Vasant More | mns leader vasant more son receive threat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Vasant More | पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांच्या नावाने एक चिठ्ठी आली असून त्यामध्ये, “सावध राहा रुपेश” असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये वसंत मोरेंनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वसंत मोरे (Vasant More) यांचा मुलगा रुपेश हे एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान ते कार्यक्रमामधून परत आले तेव्हा गाडीवर त्यांना ही चिठ्ठी सापडली. अज्ञाताने रुपेश मोरे याच्या गाडीवर चिठ्ठी ठेवली होती असं तक्रारीत म्हटलं आहे.

12 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत मोरे यांनी भव्य रोजगार मेळावा घेतला होता. या मेळाव्याचे सर्व नियोजन हे मोरेंचा मुलगा रुपेश मोरे यांच्याकडे होते. या कार्यक्रमादरम्यान एका शाळेच्या आवारात रुपेश मोरे यांची चारचाकी गाडी लावण्यात आली होती. याच ठिकाणी गाडीच्या वायपरमध्ये ‘सावध राहा रुपेश’ अशी चिट्ठी ठेवण्यात आली होती. याबाबत आता भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, “मुलगा म्हटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो.
आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही.” असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Vasant More | mns leader vasant more son receive threat

हे देखील वाचा :

Jalgaon Crime | खळबळजनक ! पोटच्या 5 वर्षाच्या मुलास गळफास देत 31 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; शहरात खळबळ

Maharashtra SSC Result 2022 | दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के

Edible Oil Price Reduced | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी पावसाची दमदार हजेरी; शनिवारपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता – IMD

Related Posts