IMPIMP

Vidhan Parishad Election | राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत झटका देण्याच्या तयारीत भाजप, ‘या’ दोन नेत्यांचा गेम होणार !

by nagesh
Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis on eknath khadse meeting amit shah joing bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार झटका दिल्यानंतर भाजपने (BJP) महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवर (Vidhan Parishad Election) लक्ष केंद्रीत केले आहे. ज्याप्रमाणे राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला झटका दिला त्याच प्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election)  झटका देण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. हा झटका काँग्रेसचे (Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) यांना बसण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि शिवसेनेचे (Shivsena) आमशा पाडवी (Amsha Padvi) यांनाच भाजपकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता अधिक आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राजकीय जाणकारांचे मत
विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election) एका जागेसाठी 27 मतांचा कोटा आहे.
हे मतदान गुप्त पद्धतीने होणार आहे. त्यामुळे केवळ अपक्षच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील आमदार (MLA) कोणाला मतदान करतात, हे पाहणे शक्य नसल्यामुळे या पक्षांची मते फुटण्याची शक्यता आहे.
लाड आणि खोत या दोघांनाही निवडून आणायचे असेल तर पहिल्या पसंतीची 47 मते आणावी लागतील.
अर्थात पहिल्या पसंतीची इतकी मते आणली नाही, तरी पसंती पद्धतीच्या मतदानामध्ये योग्य गणिती रणनिती बनवल्यास दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या मतांची बेगमी करुनही हे दोघे निवडून येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

खडसेंसाठी भाजपचा मोठा सापळा
भाजपचे चार उमेदवार निवडून येण्याची फारशी चिंता नाही. मात्र, पाचवे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) व सहावे उमेदवार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) या दोघांनाही आम्ही आरामात निवडून आणू, असे भाजपचे नेते बोलत आहेत. हे दोघेही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतरही रिंगणातच राहिले, तर भाजप काहीही करुन एकनाथ खडसे यांच्या विरोधात मोठा सापळा रचणार, तसेच शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी पाडवी यांच्यामागेही भाजप लागणार, असे त्यांचे नेते खाजगीत बोलत आहेत.

आमशा पाडवी हे आदिवासी समाजातील असून त्यांचा आमदारांशी फारसा संबंध नाही. तसेच शिवसेनेचे दुसरे उमेदवार सचिन आहिर (Sachin Ahir) हे माजी मंत्री असून, त्यांचे सर्व पक्षातील आमदारांसोबत मित्रत्व आहे. भाजपचे पाच उमेदवार प्रसाद लाड हे देखील अहिर यांचे मित्र असल्याने अहिर यांच्या मतांवर भाजपकडून डल्ला मारण्याचा फारसा प्रयत्न होणार नाही, असेही बोलले जात आहे.

 

खडसेंना क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.
खडसे यांना मानणारा मोठा वर्ग भाजपमध्ये आहे. त्यामुळे खडसे यांना भाजपमधून क्रॉस वोटिंग (Cross Voting) होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत.
असे असले तरी राज्यसभेच्या लागलेल्या निकालानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे.
तर आघाडीतील पक्षांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अपक्ष आमदारांमध्ये नाराजी
राज्यसभेला फुटलेल्या नऊ मतांपैकी काही मते विधानपरिषदेच्या निवडणुकीत आघाडीला पडू शकतात.
मात्र, अपक्षांची (Independent MLA) कोणतीही खात्री देता येत नसल्याचे आघाडीचे नेते बोलत आहेत.
त्यातच शिवसेनेच्या नेत्यांनी अपक्ष आमदारांची नावे घेऊन संशय व्यक्त केल्याने अपक्ष आमदारांच्या नाराजीत वाढ झालेली आहे.
परंतु एकनाथ खडसे यांना भाजपकडून टार्गेट केले जाऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीकडून खडसे यांचा कोटा वाढवला जाण्याची शक्यता आहे.
जर तसे झाले तर रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या मतांचा कोटा कमी होऊ शकतो.
निंबाळकर हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मर्जीतील असल्याने त्यांना काही दगाफटका झाला तर ते थेट शरद पवार यांनाच राजकीय आव्हान दिल्यासारखे होऊ शकते.
त्यामुळे या तिढ्यातून मार्ग कसा काढायचा यासंदर्भात राष्ट्रवादीमध्ये विचारविनिमय सुरु आहे.

 

मर्जीतील हुजऱ्यांच्या हातात सूत्रे देण्यापेक्षा…
राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेनेतील वरिष्ठ नेते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.
राज्यसभेची जबाबदारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या खांद्यावर दिली असती, तर कदाचित येवढी नामुष्की आली नसती, असे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत तरी आपल्या मर्जीतील हुजऱ्यांच्या हातात निवडणुकीची सूत्रे देण्यापेक्षा व्यवस्थित तयारी करुन यातील अनुभवी नेत्यांचा वापर करुन घ्यावा, असे शिवसेनेचे नेते व आमदार बोलत आहेत.

 

एकनाथ खडसेंनाच टार्गेट केले जाऊ शकते
काँग्रसेच भाई जगताप यांना दहा मतांची सोय करावी लागणार आहे.
परंतु काँग्रेसला टार्गेट करुन सरकारला फारसा फरक पडणार नाही, असे भाजपमधील धुरीणांना वाटते.
तसेच जगताप हे लाड यांच्याप्रमाणे सगळ्याच प्रकारे सशक्त उमेदवार आहेत.
त्यामुळे ते निवडणुकीची तयारी खूप पक्की करण्याची शक्यता असल्याने भाई जगताप यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांचे शत्रू क्रमांक एक खडसे यांनाच टार्गेट केले जाईल, असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vidhan Parishad Election | mlc election maharashtra eknath khadse amsha padvi shiv sena bjp Vidhan Parishad Election

 

हे देखील वाचा :

Diabetes | वैयक्तिक नातेसंबंधात अडथळा बनू शकतो ‘हा’ आजार, खाणे-पिण्याची घ्या विशेष काळजी

Aadhaar Card Updates | घरबसल्या बनवू शकता आधार कार्ड ! फोन नंबर आणि बायोमेट्रिक सारख्या अपडेटसाठी सुद्धा जावे लागणार नाही आधार केंद्रात

Presidential Election 2022 | राष्ट्रपती पदाच्या निवडणूक रिंगणात शरद पवार ?, दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या; ’आप’ देऊ शकतो पाठिंबा

 

Related Posts