IMPIMP

Presidential Election 2022 | राष्ट्रपती पदाच्या निवडणूक रिंगणात शरद पवार ?, दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या; ’आप’ देऊ शकतो पाठिंबा

by nagesh
Presidential Election 2022 | aam aadmi party aap will support ncp sharad pawar as candidate for presidential polls sources

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनPresidential Election 2022 | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना जोर चढला आहे. भाजपाविरोधी पक्षांनी यासाठी मोट बांधण्यास सुरूवात केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) या निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात. सध्या पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार (Presidential Election 2022 Candidate) असल्यास त्यांना आम आदमी पक्षाकडून (AAP) पाठिंबा जाहीर केला जाईल, असे वृत्त ’इंडिया टुडे’ ने प्रसिद्ध केले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रपती पदाची निवडणूक पुढील महिन्यात होणार आहे. कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शरद पवार राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील तर काँग्रेसचा पाठींबा असेल असे म्हटले होते. यानंतर आज आम आदमी पक्षाचाही पाठिंबा असेल, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

 

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि शरद पवार यांची राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने भेट झाली होती. आम्ही राष्ट्रपती निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा केली असे त्यावेळी खरगे आणि पवार यांनी म्हटले होते. (Presidential Election 2022)

 

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यानंतर 21 जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच विरोधी पक्षाची बैठक दिल्लीत होणार आहे. या सर्व राजकीय हालचाली पाहता शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

 

या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी गटातील नेत्यांमध्ये भेटीगाठींचे सत्र सुरु आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांनी नुकतीच शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत झालेल्या चर्चेबाबत आप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून फारशी वाच्यता करण्यात आलेली नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि शरद पवार यांची भेट झाली होती.
येत्या काही दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरणार की नाही, हे स्पष्ट होईल.
तसेच सत्ताधारी भाजपा राष्ट्रपतीपदासाठी कोणता उमेदवार देणार, याबाबत उत्सुकता आहे.
मोदी – शहा यासाठी कोणती खेळी करतात यावर पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

 

राष्ट्रपती निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
15 जून रोजी दिल्लीत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यात शरद पवार यांच्यासह देशभरातील प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
या बैठकीत शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदाबाबतच्या उमेदवारीबाबत चर्चा होऊ शकते.

 

Web Title :- Presidential Election 2022 | aam aadmi party aap will support ncp sharad pawar as candidate for presidential polls sources

 

हे देखील वाचा :

How To Burn Fat | लोण्यासारखी वितळेल शरीरातील चरबी ! ‘या’ 1 फळाचा करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

Vidhan Parishad Election 2022 | भाजप 6 जागा लढवण्यावर ठाम ! देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सदाभाऊ खोत

Stock Market | शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1600 अंकांची घसरण, गुंतवणुकदारांना 5 लाख कोटी रुपयांचा फटका

 

Related Posts