IMPIMP

Eknath Shinde Group | सोलापुरात एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, शरद पवारांचा अत्यंत जवळचा माणूस ‘शिवसेने’त

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shinde showered praise on sharad pawar in pune

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे (Dilip kolhe) आज शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) प्रवेश करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी (NCP) हा मोठा धक्का मानला जात आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये (Eknath Shinde Group) नवीन नेत्यांची भरती सुरूच आहे, असे म्हणता येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने (Eknath Shinde Group), उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) आणि राष्ट्रवादीला कमजोर करण्याचे काम सुरू केले आहे. उद्धव गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते आधीच शिंदे गटात सामील झाले आहे. आता राष्ट्रवादीचे नेतेही शिंदे गटात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे.

 

आज संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी,
म्हणजेच वर्षा बंगल्यात (Varsha Bunglow) प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
दिलीप कोल्हे हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) अत्यंत जवळचा माणूस मानले जात होते.
पण, पक्षातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून आपण शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे दिलीप कोल्हे
यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दिलीप कोल्हे आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Shinde Group | ncp former deputy mayor dilip kolhe will join the shinde group in solapur

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रविंद्र ढोले व त्याच्या साथिदारावर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 107 वी कारवाई

Shradha Walker Murder Case | दिल्ली मर्डर प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत ; मेरा अबदुल ऐसा नही म्हणत…

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

 

Related Posts