IMPIMP

Violation of Rera Act in Pune | पुणे जिल्ह्यात तब्बल दहा हजार 561 बेकायदा दस्त नोंदविल्याचे उघड; वाघोली, हडपसरमध्ये सर्वाधिक नोंदी

by nagesh
violation of rera act in pune 10561 registrations of properties dast nondani found bogus in pune violation of rera act in pune rera and fragmentation laws

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Violation of Rera Act in Pune | पुण्यासह जिल्ह्यामध्ये रेरा आणि तुकडेबंदी कायद्यांचे (Rera And Fragmentation Laws) उल्लंघन करून मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचे बेकायदा दस्त नोंद झाल्याचे तपासणीतून उघडकीस आले आहे (Violation of Rera Act in Pune). नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात (Department of Registration And Stamp Duty) असलेल्या रिक्त जागांमुळे लिपिक, वरिष्ठ लिपिकांकडे दुय्यम निबंधक या पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. संबंधितांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिकांनी तब्बल 10 हजार 561 इतके बेकायदा दस्त नोंदविल्याचे समोर आले. यामध्ये वाघोली (Wagholi) आणि हडपसर (Hadapsar) मध्ये सर्वाधिक बेकायदा दस्त नोदंणी झाल्याचे उघड झाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्य शासनाने (Maharashtra State Government) नियुक्त केलेल्या समितीने तपासणीमध्ये शहरातील सर्व 27 दुय्यम निबंधक कार्यालयांमधील संशयित दस्तांची तपासणी केली आहे. त्यामध्ये रेराकडे नोंद न करता नोंदविलेले दस्त 70 टक्के असून, तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून 30 टक्के दस्त नोंदवले गेले आहेत. (Violation of Rera Act in Pune)

 

 

‘’बेकायदा दस्त नोंदणीत गुंतलेल्या 44 अधिकारी, कर्मचार्‍यांपैकी 4 जणांना 2019 मध्ये पहिल्यांदा हा प्रकार समोर आल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे. उर्वरित अधिकारी, कर्मचार्‍यांपैकी काही जणांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. काही जणांची बदली करून विभागीय चौकशी सुरू करण्यात येईल, तर काही जणांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. वर्ग 2 च्या अधिकार्‍यांची शासनस्तरावर चौकशी अधिकारी नियुक्त करून, तर लिपिक स्तरावरील कर्मचार्‍यांची नोंदणी व मुद्रांक शुल्क स्तरावर चौकशी करण्यात येईल.’’ असं नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उपमहानिरीक्षक गोविंद कराड (Govind Karad) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, पाचशे चौरस मीटरपेक्षा अधिकचा भूखंड अथवा 8 पेक्षा अधिक सदनिका विक्रीस असणे
असा प्रकल्प असल्यास रेराकडे नोंद करणे बंधनकारक आहे.
पण, बांधकाम व्यावसायिकांनी ताबा पावती आणि ग्रामपंचायतीने घराच्या मालकीचा दिलेला
दाखला (8-ड) देऊन रेराकडे नोंद न करता दस्त नोंदणी केली आहे.
पण, दस्तांची तपासणी करताना एकाच बिल्डरचे नाव असलेल्या अनेक
सदनिकांच्या दस्तात दिसल्याने हा प्रकार समोर आला आहे.

 

 

Web Title : violation of rera act in pune 10561 registrations of properties dast nondani found bogus in pune violation of rera act in pune rera and fragmentation laws

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टॉकमध्ये लागोपाठ 5 व्या दिवशी लागले अपर सर्किट, जाणून घ्या अजूनही आहे का गुंतवणुकीची संधी

Devendra Fadnavis | ‘INS विक्रांत फाईल’ काढत राऊतांनी केलेल्या गंभीर आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime | अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी; महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

 

Related Posts