IMPIMP

Multibagger Stock | टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टॉकमध्ये लागोपाठ 5 व्या दिवशी लागले अपर सर्किट, जाणून घ्या अजूनही आहे का गुंतवणुकीची संधी

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock turns rs 1 lakh to rs 50 crore by  giving only 1 bonus issue

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Stock | मंगळवारी म्हणजेच कालच्या व्यवहारात, Tejas Networks च्या शेअरमध्ये 5 टक्क्यांनी 491 रुपयांचे अपर सर्किट लागल्याचे दिसून आले आहे. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये लागोपाठ पाचव्या दिवशी अपर सर्किट दिसून आले. (Multibagger Stock)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

टाटा ग्रुपच्या या कंपनीने जाहीर केले आहे की ते आपल्या वायरलेस प्रॉडक्ट सेवा पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी Saankhya Labs Pvt Ltd चे अधिग्रहण करतील.
ही बातमी आल्यापासून Tejas Networks चे शेअर्स उच्चांकावर दिसत आहेत.

 

गेल्या आठवड्यात Tejas Networks ने सांगितले की,
283.9 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर बंगळुरूस्थित कंपनी Saankhya Labs Pvt Ltd मधील 64 टक्के भागभांडवल विकत घेण्याचा करार केला आहे. (Multibagger Stock)

 

हा करार पूर्ण झाल्यानंतर, Saankhya Labs ही तेजस नेटवर्कची बहुसंख्य भागभांडवल उपकंपनी बनेल. Saankhya Labs मधील उर्वरित 35.60 टक्के हिस्सा विलीनीकरण प्रक्रियेद्वारे विकत घेईल.
कंपनी पुढील 120 दिवसांत विलीनीकरण योजनेची नोंदणी करेल अशी अपेक्षा आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सांख्य लॅब्सची स्थापना 2007 मध्ये झाली होती. तिने सेल्युलर वायरलेस, ब्रॉडकास्ट रेडिओ आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि ग्राउंड टर्मिनल्ससाठी सिस्टम आणि सेमीकंडक्टर उत्पादनांची विस्तृत श्रेणी विकसित केली आहे.
भारताव्यतिरिक्त जगातील इतर अनेक देशांमध्ये सांख्य लॅबचा चांगला ग्राहकवर्ग आहे.

 

तेजस नेटवर्कचे शेअर्स 2021 चे मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे.
गेल्या एका वर्षात या शेअरने सुमारे 182 टक्के रिटर्न दिला आहे. टाटा ग्रुपचा हा शेअर 2022 मध्ये आतापर्यंत 15 टक्क्यांनी वाढला आहे.

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock this stock of tata group took upper circuit for the 5th consecutive day know whether there are still investment opportunities

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘INS विक्रांत फाईल’ काढत राऊतांनी केलेल्या गंभीर आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime | मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime | मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts