IMPIMP

Pune Crime | अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी; महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

by nagesh
Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | करार करुन उसने दिलेले पैसे मागितल्याच्या (Demand Money) कारणावरुन तिघांनी महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे. तसेच अश्लील फोटो (Pornographic Photos) सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी (Threat) दिली. हा प्रकार पिंपरी येथील मोरवाडी कोर्टासमोर (Morwadi Court Pimpri) एका कारमध्ये 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास (Pune Crime) घडला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी एका पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फिरोज शब्बीर सय्यद (Feroz Shabbir Sayyed ), समीर मुलानी Sameer Mulani (दोघे रा. निगडी-Nigdi) आणि त्यांचा मित्र असे तीन जणांवर विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पीडित महिलेने तक्रार अर्ज केला होता. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर आरोपींवर मंगळवारी (दि.5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिलेने आरोपींना करार करुन 20 लाख 50 हजार रुपये हात उसने दिले होते. फिर्यादी यांनी हात उसने दिलेले पैसे परत मागितल्यावर आरोपी फिरोज याने महिलेला अश्लील फोटो सोशल मीडियावर (Social Media) टाकून बदनामी (Defamation) करण्याची धमकी दिली. तर गाडीत बसलेल्या इतर दोघांनी महिलेचा विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर लोक जमा झाले व महिलेने आपली सुटका करुन घेतली. त्यानंतर आरोपी मित्राच्या गाडीतून घटनास्थळावरुन पळून गेले. पुढील तपास पोलीस निरीक्षक आर.पी. बोबडे (Police Inspector R.P. Bobade) करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | Threats to defame by posting pornographic photos on social media; Woman molested, FIR against three

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मीच संपवणार’

Green Sprouted And Shrunken Potatoes | ‘या’ रंगाचे बटाटे अजिबात खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा धोका

MNS on Sanjay Raut | ‘ईडीने थेट राष्ट्रवादीच्याच भोंग्यावर कारवाई केली’; मनसेचा संजय राऊतांना चिमटा

 

Related Posts