IMPIMP

Devendra Fadnavis | ‘INS विक्रांत फाईल’ काढत राऊतांनी केलेल्या गंभीर आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut | devendra fadnavis is handling maharashtra govt says sanjay raut in press conference

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केल्यानंतर राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर ‘INS विक्रांत फाईल’ (INS Vikrant File) काढत गंभीर आरोप केले आहेत. अशातच यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना राऊतांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काही लोकांचा नखं कापून शहिद होण्याचा प्रयत्न आहे. तसेच लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही गोष्टी बोलल्या जातात. संजय राऊतांना पुराव्याच्या आधारे नोटीस (Notice) मिळाली असून त्यांनी कायद्याने उत्तर द्यावे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. त्यासोबतच किरीट सोमय्यांवर केलेले आरोप हास्यास्पद आहे. काळजी करण्याचं कारण नाही कारण कितीही दबावाची कारवाई केली तरी सोमय्या बोलायचे बंद करणार नाहीत, असं फडणवीस म्हणाले. यावेळी बोलताना मनसे (MNS) भाजपची ‘सी’ टीम शिवसेनेवरही फडणवीसांनी निशाणा साधला.

 

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या रकमेचं काय झालं, ती रक्कम कुठे गेली ?, सध्या भाजपचं कार्यालय झालेल्या राजभवनानं (Raj Bhavan) आपल्याला सोमय्यांकडून कोणताच निधी (Fund) किंवा चेक मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. त्याची कागदपत्रं माझ्याजवळ आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, माझा शिवसेनेला सवाल आहे की, शिवसेना (Shivsena) काँग्रेस, राष्ट्रवादीची (NCP Congress) कितवी टीम आहे.
एक मुख्यमंत्रीपद घेऊन तुम्ही पक्षाची काय अवस्था केली आहे.
आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं हे बंद करा, असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला.

 

Web Title :- Devendra Fadnavis | maharashtra opposition leader and former cm devendra fadnavis has also been targeted by sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी; महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

Pune Crime | मेफेड्रॉन बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sanjay Raut on Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्या महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मीच संपवणार’

Green Sprouted And Shrunken Potatoes | ‘या’ रंगाचे बटाटे अजिबात खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा धोका

 

Related Posts