IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लष्कर पोलिस स्टेशन – पुण्यातील निलंबीत पोलिस कर्मचार्‍याची शेजार्‍यास मारहाण

by nagesh
Pune Crime News | Lashkar Police Station – Pune’s suspended policeman assaulted his neighbor

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यातील निलंबीत पोलिस कर्मचार्‍याने शेजारी राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकास मारहाण केल्याची घटना कॅम्प परिसरातील एम.जी. रोडवर (MG Road, Camp Pune) घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिस स्टेशनमध्ये (Lashkar Police Station) संबंधित निलंबीत पोलिसासह एका महिलेविरूध्द गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

अरफाज आरिफ शेख Arfaz Arif Shaikh (27) याच्यासह एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरफाज आरफि शेख याला पोलिस दलातून निलंबीत करण्यात आले आहे. याप्रकरणी अमीर हनिफ पटेल (65) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 17 मे 2023 रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पटेल हे त्यांच्या घरासमोरील अंगणात बसले होते. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

त्यावेळी फिर्यादी पटेल यांच्या घरामागे राहणार्‍याने महिलेने त्यांना माझे फोटो का काढले, तुम्हाला माझे फोटो काढण्याचा अधिकार कोणी दिला असे सुनावले. दरम्यान, निलंबीत पोलिस कर्मचारी अरफाज आरिफ शेखने मी पोलिस आहे, मी तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत लाकडी बाबुंने फिर्यादी आणि फिर्यादीच्या मुलाला डोक्यात मारहाण केली. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बनसुडे करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Lashkar Police Station – Pune’s suspended policeman assaulted his neighbor

Related Posts