IMPIMP

Solapur Crime News | सीआयडीचे पथक अटकेसाठी आल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr. PI), सहाय्यक निरीक्षकासह 7 पोलिस ‘फरार’

by nagesh
Solapur Crime News | Pune CID Team In Solapur Seven Police Personals Are Abscond Along With Senior Police Inspector And API Vijapur Naka Chavadi Police Station

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Solapur Crime News | राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) Criminal Investigation Department Maharashtra (Maharashtra CID) पथक डेथ इन कस्टडीच्या (Death In Custody Case) प्रकरणात आपल्याला अटक (Arrest) करण्यासाठी आल्याचे समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 7 पोलिस फरार (Abscond) झाले आहेत. दरम्यान, सीआयडीच्या पथकाने त्यांची शोध मोहिम अधिक तीव्र केली असून सीआयडीच्या पथकानं सोलापूरमध्ये तळ ठोकला आहे (Solapur Crime News). सीआयडीचे पथक संबंधितांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस उप अधीक्षक गिरीष दिघावकर (DySP Girish Dighavkar) यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलताना दिली आहे. (Maharashtra Police News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सप्टेंबर 2021 मध्ये घरफोडी, चोरीच्या गुन्हयातील आरोपी भिमा रज्जा काळे Bhima Rajja Kale (42, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) याला अटक केल्यानंतर त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी त्याला मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी आरोपीला सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात (Solapur Govt Hospital) दाखल करण्यात आलं मात्र त्याचा दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी मृत्यू झाला. विजापूर नाका पोलिस स्टेशनच्या (Vijapur Naka Police Station) कोठडीत त्याला मारहाण झाली होती. मारहाणीत मृत्यू झाल्याने प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. (Solapur Crime News)

 

पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि हलगर्जीपणामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत सीआयडीने त्यावेळी
विजापूर नाका पोलिस स्टेशनचे आणि सध्या चावडी पोलिस स्टेशनचे (Chavadi Police Station)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील (Sr PI Udaysingh Shamrao Patil),
सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार मारूती कोल्हाळ (API Shitalkumar Maruti Kolhal),
पोलिस अंमलदार श्रीरंग तुकाराम खांडेकर (Police Srirang Tukaram Khandekar),
पोलिस अंमलदार शिवानंद दत्तात्रय भिमदे (Police Shivananda Dattatraya Bhimde), पोलिस अंमलदार
अंबादास बालाजी गड्डम (Police Ambadas Balaji Gaddam), पोलिस अंमलदार अतिश काकासाहेब पाटील
(Police Atish Kakasaheb Patil) आणि पोलिस अंमलदार लक्ष्मण पोमु राठोड (Police Laxman Pomu Rathod)
यांच्यावर दि. 21 एप्रिल 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक श्रीशैल्य सिद्रामप्पा गजा (DySP Srishailya Sidramappa Gaja) यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भात सीआयडीने सोलापूरच्या पोलिस आयुक्तांना (Solapur CP) अहवाल देखील सादर केला. सदरील गुन्हयाचा तपास सीआयडीचे पथक करीत होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सीआयडीचे पथक पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ आणि इतर
5 पोलिस अंमलदारांना अटकेसाठी सोलापूरमध्ये दाखल झाले. त्याबाबतची माहिती संबंधितांना समजल्याने त्यांनी
तात्काळ त्यांचे मोबाईल फोन बंद केले आणि ते गायब झाले. सीआयडीच्या पथकाने गायब झालेल्यांचा शोध घेण्यासाठी
सोलापूर येथे तळ ठोकला आहे.

Web Title : Solapur Crime News | Pune CID Team In Solapur Seven Police Personals Are Abscond Along
With Senior Police Inspector And API Vijapur Naka Chavadi Police Station

Related Posts