IMPIMP

ACB Trap News | 3 हजाराची लाच घेताना पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | Police Personal Arrested By ACB Washim Amravati In Bribe Case

वाशिम : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्हयात जामिन देण्याकरिता 3 हजार रूपयाची लाच घेताना पोलिसाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पोलिस नाईक संजय कनिराम राठोड Police Sankay Kaniram Rathod (53, मानोरा पोलिस स्टेशन, वाशिम – Washim Crime News) यांच्याविरूधद गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला असून त्यांना अटक (Washim Crime News) करण्यात आली आहे. (ACB Trap News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांवर दि. 23 एप्रिल 2023 रोजी मानोरा पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हयात तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांना अटक न करता जामिन देण्याकामी पोलिस नाईक संजय कनिराम राठोड यांनी तक्रारदाराकडे 3 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Washim Bribe Case) केली. (ACB Trap News)

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता पोलिस कर्मचारी संजय राठोड हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, दि. 18 मे 2023 रोजी सरकारी पंचासमक्ष पोलिस संजय राठोड यांनी तक्रारदाराकडून 3 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारोती जगताप (Amravati ACB SP Maroti Jagtap),
अप्पर पोलिस अधीक्षक अरूण सावंत (Addl SP Arun Sawant), अप्पर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे
(Add SP Devidas Gheware) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक गजानन शेळके
(DySP Gajanan Shelke), पोलिस निरीक्षक महेश भोसले (PI Mahesh Bhosale), पोलिस अंमलदार विनोद मार्कंडे,
पोलिस नितीन टवलारकार, पोलिस विनोद अवगळे आणि पोलिस दुर्गादास जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title : ACB Trap News | Police Personal Arrested By ACB Washim Amravati In Bribe Case

Related Posts