IMPIMP

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

वाशिम : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवभोजन थाळी केंद्राचे थकीत देयक मिळण्यासाठी पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकाऱ्याने 80 हजार लाच मागून 70 हजार लाच (Washim ACB Trap) स्वीकारल्याचा प्रकार वाशिममध्ये घडला आहे. त्यानुसार लाच लुचपक प्रतिबंधक विभागाने कारवाई (Washim ACB Trap) करत लाचखोर निरीक्षक आणि त्याचा साथीदार दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राला शिवभोजन थाळीचे कंत्राट मिळाले आहे. या दोघांची काही रक्कम थकबाकीत आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासोबत पाठपुरावा केला. पण त्यांचे देयक पुढे पाठविण्यासाठी आरोपी लोकसेवक निलेश विठ्ठलराव राठोड (वय – 33) यांनी 80 हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकाराची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आली आणि विभागाने त्यानुसार सापळा रचत कारवाई केली.

 

दि. 25 नोव्हेंबर रोजी लाचखोर राठोड यांचा माणूस अब्दुल अकिब (वय – 25, रा. सौदागर पुरा जैन मंदिर
जवळ वाशिम) याने राठोड यांच्या वतीने तक्रारदार आणि त्यांच्या मित्राकडून प्रत्येकी 35 हजार प्रमाणे एकूण 70 हजार लाच पंचासमोर स्वीकारली. त्याचवेळी सापळा पथकाने दोघांना ताब्यात घेतले. आहे. दोनही आरोपींच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत,
देविदास घेवारे आणि पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत पोलीस निरीक्षक अमोल कडू,
योगेशकुमार दंदे यांच्यासह पोलीस नाईक विनोद कुंजाम, पोलिस शिपाई शैलेश कडू आणि चालक
पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बारबुद्दे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Washim ACB Trap | Bribe demanded to get the due amount of shiv bhojan thali; Inspection Officer of Supply Department in custody of ACB

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांकडून अटक, 2 पिस्टल जप्त

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी; एमईएस क्रिकेट क्लब विजयाची हॅट्रीक

Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ‘कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत? – अजित पवार

 

Related Posts