IMPIMP

Weather Update | आगामी 4 दिवस भारतात उष्णतेची लाट; उन्हाळ्याने मोडला 12 वर्षाचा विक्रम

by nagesh
Maharashtra Weather Update | temperature may goes high in maharashtra heat will increase in vidarbha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Weather Update | गेल्या काही दिवसापासून तापमानात (Temperature) वाढ होत असल्याने उन्हाचा (Weather Update) चटका लागला आहे. प्रचंड गरमीमुळे माणसाच्या जीवाची काहिली होत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) देशात उन्हाचा कडाका लागला आहे. यानंतर आता आगामी चार दिवस संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतामध्ये (Central India) उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department), शुक्रवारी राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून अधिकाधिक तापमान 44 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहील. आज (शुक्रवारी) दिल्लीमधील किमान तापमान 25.8 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. जे सामान्यापेक्षा 2 अंशानी अधिक असते. त्याचबरोबर पश्चिम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडच्या काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. पश्चिम बंगाल, तेलगंणा आणि ओडिशाच्या पश्चिमवरही याचा परिणाम दिसून येणार असल्याचं सांगितलं. (Weather Update)

 

सकाळी 8.30 वाजता हवेतील आद्रतेची पातळी 28 टक्के होती. जेव्हा मैदानी भागामध्ये तापमान 40 अंश सेल्सीअस अथवा 4.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते तेव्हा उष्ण वारे ‘लू’ म्हणून घोषित केले जातात. जेव्हा तापमान सामान्यपेक्षा 6.4 अंश अधिक असते. तेव्हा तीव्र उष्णतेची लाट घोषित केली जातेय. असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्लीमध्ये गुरुवारी 12 वर्षातील एप्रिलचा सगळ्यात उष्ण दिवस 43.5 अंश सेल्सिअस तापमानासह नोंदवला गेला.
18 एप्रिल 2010 रोजी राष्ट्रीय राजधानीमध्ये जास्तीतजास्त तापमान 43.7 अंळ सेल्सीअस नोंदवले गेले आहे.
दरम्यान, 25 फेब्रुवारीनंतर दिल्ली एनसीआर आणि संपूर्ण उत्तर – पश्चिम भारतीय मैदानी भागामध्ये लक्षणीय पाऊस झालेला नाही.
परंतु, पश्चिम विक्षोभामुळे 2 मे रोजी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. असं हवामान तज्ज्ञ आर. के. जेनामानी (R. K. Jenamani) यांनी सांगितले.

 

Web Title :- Weather Update | extreme heat for next 4 days summer broke the 12 year record imd issued an alert

 

हे देखील वाचा :

Protein Shake Side Effects | प्रोटीन शेक पिण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 9 गोष्टी, अन्यथा पडू शकते महागात

Benefits Of Lady Finger | सुरू करा भेंडी खाणे, वाढणार नाही Blood Sugar; जाणून घ्या इतर 3 फायदे

Traffic Rules | ‘या’ 4 दिग्गज राजकारण्यांनी तोडला वाहतुकीचा नियम, झाला इतका मोठा दंड; जाणून घ्या

 

Related Posts