IMPIMP

Wedding Cost Cutting | कमी खर्चात करायचंय का लग्न? ‘या’ 7 ट्रिक वाचवतील तुमचा पैसा; जाणून घ्या

by bali123
SIP Mutual Fund | sip mutual fund investment plan crorepati kaise bane money making investment tips

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Wedding Cost Cutting | सध्या लग्नसराई सुरू आहे. पुढील 5 महिन्यापर्यंत ठरलेल्या शुभ मुहूर्तानुसार विवाह होतील. लग्न सोहळ्यासारख्या कार्यात लोक मोठ्या प्रमाणात पैसा उडवतात. एक-दोन दिवसांच्या झगमगाटानंतर पैशांची चिंता सतावू लागते. इच्छा पूर्ण करण्याच्या नादात अनेक लोक कर्जबाजारी होतात. (Wedding Cost Cutting)

 

याबाबतीत थोडा समजूतदारपणा दाखवला आणि नियोजनासह काम केले तर निश्चितच खर्चाचा भार मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. जर तुमच्या घरी किंवा नातेवाईकांमध्ये कुणाचा विवाह होणार असेल तर काही युक्ती वापरून पैसे वाचवता (Wedding Cost Cutting) येऊ शकतात.

 

या 7 युक्ती वापरा

1. वेडिंग हॉलची बुकिंग –

मॅरेज हॉलचे बुकिंग लग्नसराईपूर्वी केल्यास स्वस्तात हॉल मिळेल. मार्च किंवा एप्रिलमध्ये लग्न असेल तर आत्ताच बुकिंग करा.

 

2. भाड्याने लहेंगा-शेरवानी –

वधु-वरांच्या कपड्यांवर अमाप पैसा खर्च होतो. शिवाय हे कपडे नंतर उपयोगी येत नाही, वन टाईम वेयर असतात. वेडिंग ड्रेस भाड्याने घेऊ शकता.

 

3. भाड्याने दागिने –

कपड्यांप्रमाणे आर्टिफिशियल ज्वेलरीसुद्धा तुमचे खुप पैसे वाचवू शकते.

 

4. वेडिंग प्लानरची मदत –

वेडिंग प्लानर तुमच्या बजेटनुसार योग्य सल्ला देतात. आवश्यक सामानाचे दर त्यांना माहित असतात.

 

5. स्वतःचा मेकअप किट –

वधूच्या मेकअपसाठी मेकअप आर्टिस्टचे कॉन्ट्रॅक्ट ठिक आहे, पण आर्टिस्ट आपल्या सामानासह मेकअप करण्याचे दुप्पट पैसे घेतात. म्हणून स्वताचा मेकअप किट आणा.

 

6. हिवाळ्याच्या हिशेबाने ठरवा डिश –

विवाह हिवाळ्यात असेल तर कॅटरिंगमधून त्या गोष्टी दूर करा ज्यांची गरज हिवाळ्यात नसते. अशाप्रकारचे 4-5 आयटम जरी कमी केले तरी कॅटरिंगच्या कॉन्ट्रॅक्टमधून तुमचे भरपूर पैसे वाचतील.

हे वाचलेले पैसे तुम्ही लग्नाच्या इतर कामासाठी वापरू शकता. यामुळे तुमचा दुहेरी फायदा होईल.

 

7. डिजिटल कार्डने निमंत्रण –

लग्नाच्या महागड्या इन्व्हेस्टिंग कार्डऐवजी डिजिटल कार्ड बनवा आणि मित्र आणि नातेवाईक,
हितचिंतकांना हे डिजिटल कार्ड व्हॉट्सअप किंवा इतर सोयीच्या माध्यमातून पाठवा.
तसाही सध्या याचा खुप मोठा ट्रेंड आहे. जर तुम्हाला कार्ड छापायचे असतील तर आपल्या स्पेशल गेस्टची एक यादी तयार करा आणि त्या हिशेबानेच कार्ड छापा. (Wedding Cost Cutting)

Web Title :- Wedding Cost Cutting | wedding cost cutting 7 best tips to reduce marriage expense in india marathi news sarkarsatta

Related Posts