IMPIMP

Winter Session 2022 | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; म्हणाले, ‘रोहित पवार बिनडोक माणूस…’

by nagesh
Winter Session 2022 | gopichand padalkar criticized rohit pawar on sangharsh book distribution in assembly winter session

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) सध्या नागपूर येथे सुरू असून यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. कर्नाटक सीमावाद तसेच महापुरूषांचा अपमान या मुद्यांवर विरोधकांनी या हिवाळी अधिवेशनाचे (Winter Session 2022) सकाळचे सत्र चांगलेच गाजवले. त्याचबरोबर भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. पडळरांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session 2022) विधानभवन परिसरात आमदार रोहित पवार हे ‘संघर्ष’ या पुस्तकाचे वाटप करत होते. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. पडळकर म्हणाले, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या रोहित पवारांना ‘संघर्ष’ या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरदेखील निशाना साधला.

 

पडळकर म्हणाले, ‘रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या रोहित पवारांना ‘संघर्ष’ या शब्दाचा अर्थ तरी कळतो आहे. रोहित पवारांनी असा कोणता संघर्ष केला आहे, की ते ‘संघर्ष’ नावाचं पुस्तक वाटत आहेत. आज हे लोक फुले-शाहू-आंबेडकरांची पुस्तकं वाटत आहेत. मात्र, फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेण्याची पात्रता पवार कुटुंबियांची नाही. ज्या पवारांनी चारवेळी राज्याचे मुख्यमंत्रीपद भोगलं, त्यानंतर त्यांचाच पुतण्या या राज्याचा उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि अर्थमंत्री होतो आहे. त्यांचीच मुलगी परत खासदार होते, त्यांचाच नातू परत आमदार होतो. हे फुले-शाहू-आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकात लिहीले आहे?’ अशी तोफ त्यांनी रोहित पवारांवर डागली आहे.

 

तसेच सीमावादाच्या मुद्यावरून देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. ‘इतकी वर्षे जलसंपदा विभाग ताब्यात असताना देखील जतसारख्या भागाला ते पाणी देऊ शकले नाहीत. मग सीमावादावर बोलायचा त्यांना अधिकार काय? असा देखील प्रश्न त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे.

 

बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. तसेच या संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असेल असे या संस्थेच्या घटनेत लिहीले होते. मात्र शरद पवारांनी ती घटनाच बदलली. याचे नेमके कारण काय? पदाचा गैरवापर करण्यात पवार कुटुंबीय पुढे आहे, मग त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? शाहू-फुल-आंबेडकरांचे नाव घेता आणि महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करता? असा सवाल करत आता राष्ट्रवादीकडे मुद्दाच शिल्लक राहिला नाही असा देखील सवाल पडळरांनी यावेळी उपस्थित केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Winter Session 2022 | gopichand padalkar criticized rohit pawar on sangharsh book distribution in assembly winter session

 

हे देखील वाचा :

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील

Pune Crime | दौंड तालुक्यात महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या, काही दिवसांपूर्वी प्रेमप्रकरणातून झाली होती मारहाण

 

Related Posts