IMPIMP

Winter Session -2022 | अजित पवारांनी उपस्थित केला ‘कोयता गँग’चा मुद्दा, म्हणाले- ‘हवं तर त्यांना…’

by nagesh
Winter Session -2022 | maharashtra assembly hiwali adhiveshan ajit pawar on koyta gang

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – Winter Session -2022 | हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरला. विकासकामांना दिलेल्या स्थगितीचा मुद्दा अजित पवारांनी (Ajit Pawar) उपस्थित केल्यानंतर खडाजंगी झाली. यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रस्ता सुरक्षेचा (Road Safety) मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावरुन वाद झाला. मात्र, अजित पवार यांनी ‘कोयता गँग’ बाबत (Koyta Gang) मुद्दा उपस्थित केल्यानंतर पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात विशेषत: शहरी भागामध्ये कोयता गँगची दहशत वाढू लगाल्याची चिंता अजित पवार यांनी विधानसभेत (Winter Session -2022) बोलताना व्यक्त केली.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत, कोयता गँगचा मुद्दा उपस्थित केला. राज्याच्या अनेक भागामध्ये अशा घटना घडल्या आहेत. एक कोयता गँग नावाची गँग निर्माण झाली आहे. ते जातात आणि दहशत निर्माण करतात. काचा फोडतात, महिलांना दमदाटी करतात. हॉटेलमध्ये जाऊन खातात, बिल देत नाहीत, मध्यमवर्गीयांच्या गाड्यांची तोडफोड करतात. राज्याच्या शहरी भागात हे मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (Winter Session -2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार पुढे म्हणाले, ज्या मुलांना पकडले जाते ती मुले कॉलेजची आहेत.
कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी बघतात, चित्रपट बघतात आणि असा दारु पिऊन गोंधळ घालतात. माझी सरकारला विनंती आहे की, हे कुठल्याही परिस्थितीत थांबलं पाहिजे. पोलीस दलाच्या आपण मोठ्या प्रमाणावर बदल्या (Maharashtra Police Transfer) केल्या आहेत. तो तुमचा अधिकार आहे. पण त्या सगळ्या अधिकाऱ्यांना हे कोयता गँगचे प्रकार होऊ नयेत असे आदेश द्यावेत. हवं तर त्यांना मोक्का (MCOCA Action) Mokka लावा, तडीपार करा, जी कुठली कठोर कारवाई करायची असेल ती करा, अशी मागणी पवार यांनी केली.

 

Web Title :- Winter Session -2022 | maharashtra assembly hiwali adhiveshan ajit pawar on koyta gang

 

हे देखील वाचा :

Winter Session -2022 | कामकाज तहकूब करताच देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले- ‘हे बरोबर नाही’

Gram Panchayat Election Result-2022 | विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचा पालकमंत्री भुमरेंना दणका, बिडकीन, आडुळमध्ये ठाकरे गटाचे सरपंच

Eye Care Tips | तासन् तास लॅपटॉप व मोबाइल वापरामुळे डोळे दुखतात का? अवलंबा हे ३ घरगुती उपाय, मिळेल ताबडतोब आराम

Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण

 

Related Posts