IMPIMP

Gram Panchayat Election Result-2022 | विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंचा पालकमंत्री भुमरेंना दणका, बिडकीन, आडुळमध्ये ठाकरे गटाचे सरपंच

आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ठाकरे गटाचे बबन भावले, तर बिडकीन येथे अशोक धर्मे विजयी

by nagesh
Gram Panchayat Election Result-2022 | Opposition Leader Ambadas Danve's Guardian Minister Bhumre, Bidkeen, Sarpanch of Thackeray Group in Adul

संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – संभाजीनगर जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल (Gram Panchayat Election Result-2022) हाती यायला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघातील बिडकीन आणि आडुळ ग्रामपंचायतीमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) सरपंच विजयी झाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पैठण विधानसभा मतदारसंघातील (Paithan Assembly Constituency) आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे (Thackeray Group) गेल्यामुळे भुमरेंना हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. (Gram Panchayat Election Result-2022)

 

बिडकीन येथे प्रचार संपल्यानंतर भुमरे यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) उमेदवारांना मतदान करण्याचे
आवाहन करत आचारसंहितेचा (Code of Conduct) भंग केल्याचा आरोप भुमरे यांच्यावर झाला होता.
यावर मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जात नाही, असे म्हणत भुमरेंनी आरोप फेटाळले होते.
याच बिडकीनच्या सरपचंपदाच्या निवडणुकीत भुमरेंच्या गटाला पराभव पत्करावा लागला आहे.

 

Web Title :- Gram Panchayat Election Result-2022 | Opposition Leader Ambadas Danve’s Guardian Minister Bhumre, Bidkeen, Sarpanch of Thackeray Group in Adul

 

हे देखील वाचा :

Eye Care Tips | तासन् तास लॅपटॉप व मोबाइल वापरामुळे डोळे दुखतात का? अवलंबा हे ३ घरगुती उपाय, मिळेल ताबडतोब आराम

Winter Foods | हिवाळ्यात शरीर आतून ठेवायचे असेल गरम? रोज खा हे 3 फूड्स, थंडीपासून होईल रक्षण

Thane ACB Trap | 3 हजाराची लाच घेताना पोलीस अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात, पोलीस ठाण्यातच स्विकारली लाच

 

Related Posts