IMPIMP

Work From Home New Rule | WFH बाबत आला सरकारचा नवीन नियम, 50% कर्मचार्‍यांनी ऑफिसमध्ये येणे आवश्यक

by nagesh
Work From Home New Rule | commerce ministry announces new work from home rules for sezs details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Work From Home New Rule | सरकारने Work From Home साठी नवीन नियम जाहीर केले आहेत. या अंतर्गत कर्मचारी जास्तीत जास्त एक वर्ष घरून काम करू शकतात. यासोबतच वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कंपनी जास्तीत जास्त 50 टक्के कर्मचार्‍यांवर याची अंमलबजावणी करू शकते. (Work From Home New Rule)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये लागू
वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करून नवीन नियमांची माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की वर्क फ्रॉम होम करण्याचे हे नियम स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील (SEZ) युनिट्ससाठी आहेत. म्हणजेच या भागात असलेल्या कंपन्या आता त्यांच्या कर्मचार्‍यांना नवीन नियमांनुसार घरून काम करण्याची परवानगी देऊ शकतात.

 

उद्योगांच्या मागणीवर सरकारचा शिक्का
बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मंत्रालयाने सांगितले की, उद्योग अनेक दिवसांपासून याची मागणी करत होते आणि त्या आधारावर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सर्व स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी (एसईझेड) वर्क फ्रॉम होम धोरण समान रीतीने लागू करण्याची मागणी उद्योगांनी सरकारकडे केली होती. यावर चर्चा केल्यानंतर, स्पेशल इकॉनॉमिक झोन नियम, 2006 मध्ये, वर्क फ्रॉम होम हा नवीन नियम 43अ अधिसूचित करण्यात आला आहे. (Work From Home New Rule)

 

आयटी क्षेत्राशी संबंधीत कर्मचार्‍यांना तील फायदा
स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी (एसईझेड) सरकारच्या नवीन नियमांनुसार, काही श्रेणीतील कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी असेल. यामध्ये माहिती तंत्रज्ञान (IT) आणि आयटीशी संबंधित इतर क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले की या नियमानुसार केवळ तेच कर्मचारी घरून काम करू शकतील, जे तात्पुरते कामावर येऊ शकत नाहीत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सांगावे लागले खरे कारण

वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचनेत असेही नमूद केले आहे की, नवीन नियमानुसार,
स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) च्या विकास आयुक्तांना परवानगी देण्याचा अधिकार असेल
की, वास्तविक कारणांमुळे, युनिट आपल्या 50 टक्के कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी देऊ शकते.
मात्र, कर्मचार्‍यांची संख्या आणि कारण लिखित स्वरूपात नोंदवणे आवश्यक आहे.

 

Web Title :- Work From Home New Rule | commerce ministry announces new work from home rules for sezs details here

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लोणावळा परिसरात क्रिकेट सामन्यावर सट्टा, चार जण गजाआड; 2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

ITR Alert ! तुम्हाला सुद्धा प्राप्तीकर विभागाकडून SMS येतात का, काय आहे याचा अर्थ आणि तुमच्यासाठी किती महत्वाचे?

OBC Reservation | ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, मात्र ‘या’ चार ठिकाणी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार

 

Related Posts