IMPIMP

Yugal Suraksha Yojana | एकाच प्रीमियममध्ये पती-पत्नीला मिळेल इन्श्युरन्स कव्हर, कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध; जाणून घ्या

by nagesh
Yugal Suraksha Yojana | know about post department yugal suraksha yojana premium maturity and other benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–   Yugal Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसची लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी (post office’s life insurance policy) केवळ वैयक्तिकच नव्हे, तर जॉईंट पॉलिसी (joint policy) सुद्धा करते. ज्यामध्ये एकाच प्रीमियम (premium) वर दोन लोक एकाचवेळी कव्हर होतात. प्रत्यक्षात ही पॉलिसी प्रामुख्याने पती-पत्नीसाठी (policy for couple) आहे. जिचे नाव युगल सुरक्षा योजना (Yugal Suraksha Yojana) आहे. या योजनेत 20 हजार रुपयांपासून 50 लाख रुपयांचे सम अ‍ॅश्युअर्ड (sum assured) घेतले जाऊ शकते. तिचे प्रमुख वैशिष्ट हे आहे की, ही पॉलिसी 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेले लोक घेऊ शकत नाहीत. तर 21 वर्षावरील कुणीही युगल पॉलिसी घेऊ शकते. या पॉलिसीबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कुणासाठी आहे ही पॉलिसी

Yugal Suraksha Policy ला केंद्र सरकारकडून पूर्ण सुरक्षा मिळाली आहे. सोबतच मॅच्युरिटी नंतर बोनससुद्धा मिळतो.
जो केंद्र सरकार ठरवते. ही योजना केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सेमी गव्हर्न्मेंट ऑर्गनायजेशनमध्ये काम करणारे लोक घेऊ शकतात.
याशिवाय डॉक्टर, इंजिनियर, मॅनेजमेंट, सीए, वकील आणि बँकेत काम करणारे कर्मचारीसुद्धा घेऊ शकतात.
मान्यत प्राप्त शिक्षण संस्थांमध्ये काम करणारे लोकसुद्धा ही पॉलिसी घेऊ शकतात.

Yugal Suraksha पॉलिसीची वैशिष्ट्ये

बोनससह विमा रक्कमेच्या मर्यादेपर्यंत पती-पत्नीला जीवन विमा.


किमान विमा रक्कम 20,000 रुपये आणि कमाल 50 लाख रूपये.

जोडीदारासह प्रवेशासाठी किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय 45 वर्ष.

3 वर्षानंतर कर्ज सुविधा.

पती किंवा पत्नी किंवा मुख्य पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या स्थितीत जिवंत असलेल्या पैकी एकाला मृत्यु लाभ दिला जाईल.

अंतिम घोषित बोनस – 58 रुपये प्रति 1000 रुपये प्रतिवर्ष.

प्रीमियम दरमहिना, तीन महिन्यासाठी, सहामाही किंवा वार्षिक भरू शकता.

पॉलिसी किमान 5 वर्ष आणि कमाल 20 वर्षासाठी घेता येऊ शकते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

प्रीमियमचे कॅलक्युलेशन जाणून घ्या

जर कुणी व्यक्ती 30 वर्षाचा असेल आणि त्याची पत्नी 28 वर्षाची असेल आणि 20 वर्षासाठी 10 लाख रुपये सम अ‍ॅश्युअर्डची युगल सुरक्षा पॉलिसी घेतली तर त्यांना 20 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागेल.
जर त्यांनी मासिक प्रीमियमचा पर्याय निवडला तर त्यांना यासाठी पहिल्या वर्षी 4392 रुपये प्रति महिना प्रीमियम भरावा लागेल.
तर दुसर्‍या वर्षी 4,297 रुपये प्रति महिना प्रीमियम द्यावा लागेल. पहिल्या वर्षी प्रीमियम जास्त असण्याचे कारण आहे जीएसटी जास्त असणे.
अशाप्रकारे 20 वर्षात एकुण प्रीमियम 10.30 लाख रुपये भरवा लागेल. (Yugal Suraksha Yojana)

किती मिळतो रिटर्न

मॅच्युरिटीनंतर 10 लाख रुपये सम अ‍ॅश्युअर्डसह 10.40 लाख रुपयांचा बोनससुद्धा दिला जाईल. म्हणजे 20 वर्षानंतर पॉलिसीधारकाला 20.40 लाख रुपये मिळतील.
या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिटचा सुद्धा समावेश आहे. पॉलिसी घेण्याच्या 2, 5 किंवा 15 वर्षानंतर तुमच्या जोडीदाराचा मृत्यू झाला तर दुसर्‍या पार्टनरला सम अ‍ॅश्युअर्डसह जेवढे वर्ष पॉलिसी सुरू होती त्या हिशेबाने बोनस दिला जाईल. समजा 5 वर्षानंतर पार्टनरचा मृत्यू झाला तर दुसर्‍याला 10 लाख रुपयाची सम अ‍ॅश्युअर्ड आणि 5 वर्षाचा बोनस 2.60 लाख रुपये मिळतील.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

Web Title : Yugal Suraksha Yojana | know about post department yugal suraksha yojana premium maturity and other benefits

 

हे देखील वाचा :

Akhil Bhartiya Maratha Mahasangh | ‘या’ आरोपानंतर अखिल भारतीय मराठा महासंघात मोठा पेच, महासंघात फूट?

Pune News | मुसळधार पावसाचा मंगळवार पेठेतील काही भागाला फटका; सभागृह नेते गणेश बिडकर, मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी

Chandrapur Crime | खळबळजनक ! मुख्याध्यापकाकडून 7 अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शाळेच्या पहिल्या दिवशी घडलेली घटना

 

Related Posts