IMPIMP

Ajit Pawar | नक्की काळबेरं ! ‘106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही’

by nagesh
Ajit Pawar | send ajit pawar in pakistan says bjp former mla narendra pawar over statement sambhaji maharaj is not dharmveer

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइननेत्याबरोबर शिवसैनिक (Shivsena) जात नाहीत हा इतिहास आहे. येत्या निवडणुकीत ते दिसेलच… पण एका गोष्टीचं कुतुहल आहे.. ज्या वेळेस भाजप (BJP) आणि शिंदे गट यांनी सरकार स्थापन करायचं ठरवलं, त्यावेळी 106 आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री (CM) होत नाही, 40 आमदाराची व्यक्ती मुख्यमंत्री होते, त्यात नक्की काही तरी काळंबेरं आहे, अशी शंका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. तसेच भाजपचे आमदार भविष्यात शिंदेंच्या मंत्र्यांना बोलायला मागे पुढे पाहणार नहीत… आमच्यामुळे तुमचं सरकार आहे असं म्हणतील, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आघाडी सरकारमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नावाची चर्चा होती. पण सर्वांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ती जबाबदारी घ्यावी लागली, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला. एकनाथ शिंदे जांच्याबरोबर गेले आहेत, त्या भाजपने शिवसेनेची मदत घेऊन टप्प्या टप्प्याने पक्ष वाढवत नेला. 1980 साली भाजपचे 14 आमदार होते. 1990 साली 16 झाले, 95 साळी 65 झाले, 2014 मध्ये 122 आणि 2019 ला 105 आमदार निवडून आले. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असे सांगत पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सावधानतेचा इशारा दिला.

 

अजित पवारांनी वाचून दाखवली यादी
दादाजी बुशे (Dadaji Bushe) – 306 कोटी, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) – 309 कोटी,
शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) – 294, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) – 206,
अनिल बाबर (Anil Babar) – 286 कोटी, महेश शिंदे (Mahesh Shinde) -170 कोटी,
शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) – 151 कोटी, महेंद्र थोरवे (Mahendra Thorve)-154 कोटी

 

मग माझं काय चुकलं
अजित पवार म्हणाले, 288 आमदारांना सगळे पैसे मिळाले पाहिजे हा माझा प्रयत्न होता. कसलाच भेदभाव केला नाही.
तुम्ही सातत्याने अन्याय केला असं म्हणता. शिंदेसाहेब आपण खासगीत बोलत होतो.
पुरवणी मागण्यांमध्ये नगरविकास खात्याला अजून निधी देण्याचा मी शब्द दिला होता.
सर्व खात्यांना पुरेसा निधी दिला. शिवभोजन थाळी केंद्राच्या (Shiv Bhojan Thali Center) वेळीही शिवसेना आमदारांच्याच सर्वाधिक शिफारशी मान्य केल्या.
मग मझं काय चुकलं, असा सवाल त्यांनी केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ajit Pawar | maharashtra assembly ajit pawar said no chief minister with 106 mlas devendra fadnavis cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम ! दररोज 50 रुपये गुंतवा अन् मिळवा 35 लाखांचा परतावा; जाणून घ्या

Eknath Shinde Government | शिवसेनेला धक्का दिला ! अब की बार, शिंदे सरकार

Ajit Pawar | … मग माझं काय चुकलं, बंडखोर आमदारांना अजित पवारांचे रोखठोक उत्तर

 

Related Posts