IMPIMP

Ajit Pawar | … मग माझं काय चुकलं, बंडखोर आमदारांना अजित पवारांचे रोखठोक उत्तर

by nagesh
Maharashtra Governement Holidays | next year maharashtra government employees got 24 holidays but ajit pawar offset on holidays

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनAjit Pawar | राष्ट्रवादीने (NCP) आमच्यावर अन्याय केला असा पाढा अनेकांनी वाचला. मी काम करताना भेदभाव कधीच करत नाही हे सगळ्यांना माहितीय. आमदार निधी (MLA Fund) मीच दोन कोटी रुपयांवर नेला. 288 आमदारांना सगळे पैसे मिळाले पाहिजे हा माझा प्रयत्न होता. आतापर्यंत काम करताना कसलाच भेदभाव केला नाही, अशा शब्दात बंडखोर शिवसेना आमदारांना (Rebel Shivsena MLA) प्रत्युत्तर देत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांना दिलेल्या निधीची यादीच सभागृहात वाचून दाखवली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवसेनेचे जे आमदार माझ्याकडे आले, त्यांना मी कधी मोकळ्या हाताने परत पाठवलं नाही. निधी दिला म्हणजे उपकार केला नाही, पण मी भेदभाव करणारा माणूस नाही, हे मला सांगायचं. पण माझी आणि राष्ट्रवादीची जी बदनामी होत आहे, ती आमदारांनी थांबवावी. जरा खरं बोलावं, अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोर आमदारांना खडसावलं.

 

अजित पवारांनी वाचून दाखवली यादी

दादाजी भुसे (Dadaji Bushe) – 306 कोटी, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) – 309 कोटी, शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) – 294, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) – 206, अनिल बाबर (Anil Babar) – 286 कोटी, महेश शिंदे (Mahesh Shinde) -170 कोटी, शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) – 151 कोटी, महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) – 154 कोटी

 

मग माझं काय चुकलं

अजित पवार म्हणाले, 288 आमदारांना सगळे पैसे मिळाले पाहिजे हा माझा प्रयत्न होता.
कसलाच भेदभाव केला नाही. तुम्ही सातत्याने अन्याय केला असं म्हणता. शिंदेसाहेब आपण खासगीत बोलत होतो.
पुरवणी मागण्यांमध्ये नगरविकास खात्याला अजून निधी देण्याचा मी शब्द दिला होता. सर्व खात्यांना पुरेसा निधी दिला.
शिवभोजन थाळी केंद्राच्या (Shiv Bhojan Thali Center) वेळीही शिवसेना आमदारांच्याच सर्वाधिक शिफारशी मान्य केल्या.
मग माझं काय चुकलं, असा सवाल त्यांनी केला.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp ajit pawar answer rebel shivsena mla over his allegation development fund

 

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar And Devendra Fadnavis | अजितदादा देवेंद्र फडणवीसांची जागा घेणार?

Eknath Shinde Government | राज्यात आता ‘शिंदेशाही’ ! एकनाथ शिंदे सरकारनं बहुमत जिंकले

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नेत्र चिकित्सक महिलेला दोन लाखांना गंडा; क्रेडिट कार्डला सर्व्हिस चार्ज लागत असल्याचे सांगून केली फसवणूक

 

Related Posts