IMPIMP

Karuna Sharma Munde | ‘मी आमदाराची पत्नी आहे, एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते ते मला चांगलं माहीत आहे’ – करुणा मुंडे

by nagesh
Karuna Sharma Munde | mhada houses for mla in mumbai karuna sharma munde slams maha vikas aghadi government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Karuna Sharma Munde | आमदारांना मुंबईमध्ये घरे देण्याच्या निर्णयावरुन राज्यातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) अनेकांनी टीकास्त्र सोडलं आहे. खरंतर सामान्य जनतेतून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा शर्मा – मुंडे (Karuna Sharma Munde) यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर जोरदार विरोध दर्शविला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सरकारच्या निर्णयावरुन बोलताना करुणा शर्मा – मुंडे (Karuna Sharma Munde) म्हणाल्या की, ”काही दिवसांपूर्वीच आमदारांच्या मानधनात वाढ झाली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांचाही पगार वाढवण्यात आलाय आणि आता आमदारांना घर बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना गोरगरीब जनतेनं निवडून मुख्यमंत्री बनवलंय आणि ते आमदारांना घर देत आहेत,” अशी उद्विग्नता करुणा शर्मा – मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

 

पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, ”मुंबईतील आझाद मैदानात आजही आरोग्य सेविकांपासून एसटी कर्मचारी, ग्रामीण भागात तळागाळात काम करणारे अनेक शिक्षक बेमुदत उपोषण करताहेत.
अवघ्या 10 ते 12 हजार रुपयांच्या पगारासाठी त्यांना उपोषण करावं लागत आहे.
त्यांचा साधा आवाजही मुख्यमंत्र्यांना ऐकू जात नाही, हे भयंकर आहे. मी स्वत: एका आमदाराची पत्नी आहे.
माझा नवरा 15 वर्षांपासून आमदार आहे. एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते हे मला चांगलं माहीत आहे.
आज अनेक आमदारांकडं कोट्यवधींची आणि अब्जावधींची प्रॉपर्टी आहे. असं असताना त्यांना घरं दिली जात आहेत.
उद्धव ठाकरे हे आमदारांची घरं भरण्यासाठी मुख्यमंत्री झालेत की गोरगरीब लोकांची दु:ख दूर करण्यासाठी ?. असं त्या म्हणाल्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, ”महाराष्ट्रातील शिक्षकांचा 8 महिन्यांपासून पगार झालेला नाही.
त्यांचा पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, पण आमदारांसाठी पैसा आहे.
2 – 2 वर्षांची मुलं घरी सोडून महिला शिक्षिका, आरोग्य सेविका मुंबईत आंदोलनासाठी आल्या आहेत.
त्यांचा काहीतरी विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा.
त्यांनी आझाद मैदानात जायला हवं, तसेच, ‘सरकारनं आमदारांना घरं देण्याचा निर्णय कायम ठेवला,
त्यांचं मानधन वाढवलं व त्यांच्या नोकरांचा पगार वाढला तर मी संपूर्ण राज्यात उग्र आंदोलन करेन,” असा इशारा करुणा शर्मा यांनी सरकारला दिला आहे.

 

Web Title :- Karuna Sharma Munde | mhada houses for mla in mumbai karuna sharma munde slams maha vikas aghadi government

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सतिश बोरा अँड असोसिएट्सचे सतिश बोरा, सुजाता बोरा, पंकज बोरा यांच्यावर FIR

Nilesh Rane Criticizes CM Uddhav Thackeray | निलेश राणेंची उध्दव ठाकरे यांच्यावर खोचक टीका, म्हणाले – ‘मेव्हणा पकडला अन् मुख्यमंत्री बाहेर आले’

Pune Crime | औंध गावात मैत्रिणीसोबत पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग; चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात FIR

 

Related Posts