IMPIMP

Rain in Maharashtra | आगामी 3 ते 4 तासात मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

by bali123
Rain in Maharashtra | rain very likely occur isolated places palghar thane and mumbai during next 3 to 4 hours

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rain in Maharashtra | मुंबईसह ठाणे, पालघर या जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. शुक्रवारी तर पालघर जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच होती. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये तर जोराच्या पावसाने वेग घेतला आहे. दरम्यान आता आगामी तीन ते चार तासामध्ये मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून इशारा (Rain in Maharashtra) देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे तसेच आजूबाजूच्या ठिकाणी रात्रभर काही प्रमाणात हलका ते जोरदार पाऊस पडला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी आगामी 3 ते 4 तासामध्ये मध्यम आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे. महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) सर्वत्र पावसाचं वातावरण झालं आहे. त्यामुळे मागील दोन दिवस पावसाची रिमझिम सुरु आहे. यामुळे राज्यात पावसाला वेग येत असल्याचे दिसत आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

दरम्यान, पालघर, ठाणे, नाशिक आणि मुंबई या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (Meteorological Department) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर कोकण किनारपट्टी (Konkan coast) परिसरात जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भागांत पुढील 3 ते 4 तासांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
ठाणे, कल्याण, रायगड परिसर आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात प्रचंड काळे ढग दिसून येत आहेत.

Web Title :- Rain in Maharashtra | rain very likely occur isolated places palghar thane and mumbai during next 3 to 4 hours

Zycov D Vaccine | 12 वर्षावरील सर्व वयोगटासाठी नवीन कोरोना व्हॅक्सीन Zycov D, कसे होईल व्हॅक्सीनेशन; जाणून घ्या

Pune Crime | भाच्याकडून मामाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन खुनाचा प्रयत्न

Pune Police | कोण ठरणार ‘ते’ 75 ‘भाग्यवान’ पोलीस अंमलदार; पुणे शहर पोलीस दलात उत्सुकता 

Related Posts