IMPIMP

Pune Crime | बजाज कंपनीच्या बनावट अकाउंटद्वारे फसवणूक

by nagesh
Pune Cyber Crime News | Hadapsar Police Station - 21 lakh fraud in the name of giving dealership of Ather Energy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बजाज फायनांन्स कॉर्पोरेट कंपनीच्या लोगोचा (bajaj finance corporate company logo) वापर करून सोशल मीडियावर (Social Media) बनावट अकाऊंट उघडून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी (viman nagar police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी बजाज फायनांन्स कॉर्पोरेट कंपनीचे युवराज चंद्रकांत मोरे (वय 34 रा. विमानतळ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बजाज कंपनीचा लोगो वापरून कंपनीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडले. ट्विटर आदी सोशल मीडियावर हे बनावट अकाऊंट ऍक्टिव्ह करण्यात आले होते. नागरिकांना कर्ज व इन्शुरन्स पॉलिसी मिळवून देण्याचे काम कंपनी करीत असल्याची जाहिरात या बनावट अकाउंटवरून करण्यात आली होती. अनेक नागरिकांनी या अकाउंटवर कर्ज व पॉलिसी काढण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. आरोपींनी या नागरिकांकडून ऍडव्हान्स रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली. हा सर्व प्रकार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास विमानतळ पोलिस (viman nagar police) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | bajaj finance corporate company logo Fraud through fake Bajaj account

 

हे देखील वाचा :

Pune News | क्रिकेटच्या क्लासला जात असलेल्या 18 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, 11 वर्षीय भाऊ गंभीर जखमी; गॅरेज चालकाला अटक

Gold Price Today | खुशखबर ! सोने 11,000 रूपयांनी झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी ‘घसरण’; जाणून घ्या नवीन दर

Crime News | तेलंगणात भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाला जिवंत जाळले

 

Related Posts