IMPIMP

Pune News | क्रिकेटच्या क्लासला जात असलेल्या 18 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, 11 वर्षीय भाऊ गंभीर जखमी; गॅरेज चालकाला अटक

by nagesh
Talegaon Chakan Highway Accident | young man crushed by tanker on talegaon chakan national highway at maval pune

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune News | काकासोबत क्रिकेटच्या क्लासला जात असलेल्या 18 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला. तर त्याचा अकरावर्षीय भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना चंदननगर येथील खराडी गावठाण (Chandannagar Kharadi) चौकामध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका गॅरेज चालकाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास (Pune News) घडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आर्य विनोद गलांडे (वय 18) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याचा लहान भाऊ
वेदांत विनोद गलांडे (वय अकरा) हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी रोहित अनिल वळवी (रा. 22 रा. किर्तने बाग, रासकर चौक, मुंढवा) याला अटक केली आहे. तर, भास्कर रामदास गलांडे (वय 41, रा. बॉम्बे सॅपर्स कॉलनी, वडगाव शेरी)  यांनी फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police) दिलेल्या माहितीनुसार,  रोहित वळवी याचे मोटर गॅरेज आहे. तो दुरुस्तीकरिता आलेली कार घेऊन नातेवाइकांच्या घरी काही वस्तू देण्याकरिता गेला होता. परत येत असताना अपघात घडला. भास्कर गलांडे हे त्यांचे पुतणे आर्य आणि वेदांत या दोघांना खराडी येथील क्रिकेट क्लबमध्ये सोडण्यास निघाले होते. त्यावेळी, वळवी चालवीत असलेल्या भरधाव कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. आर्यचा गंभीर जखमी झाल्याने जागेवरच मृत्यू झाला. तर, वेदांत हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी वळवी यांना तात्काळ अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.

 

Web Title : Pune News | An 18 year old boy going to a cricket class died in an accident, his 11 year old brother was seriously injured; Garage driver arrested

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! सोने 11,000 रूपयांनी झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी ‘घसरण’; जाणून घ्या नवीन दर

Crime News | तेलंगणात भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाला जिवंत जाळले

Pune Crime | पुण्यात डॉक्टर महिलेच्या कारच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यु; कोरेगाव पार्कमध्ये डॉ. मेघना चावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Anti Corruption Nashik | 8 लाखांच्या लाच प्रकरणी महिला शिक्षणाधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; महासंचालकांच्या आदेशाने ठाणे ACB कडून नाशिकमध्ये कारवाई, प्रचंड खळबळ

 

 

Related Posts