IMPIMP

Indian Railways | IRCTC ने ऑनलाइन ट्रेन तिकिट बुकिंगचे ‘हे’ नियम बदलले, करावे लागेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

by nagesh
IRCTC Credit Card | indian railways irctc npci bank of baroda arm launch co branded credit card for railway customers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Indian Railways | रेल्वेच्या ऑनलाइन तिकिट बुकिंग (Indian Railways) च्या नियमात बदल झाला आहे. आता ऑनलाइन तिकिट बुकिंगसाठी मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीचे व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की IRCTC पोर्टलवर जी अकाऊंट निष्क्रिय होती त्यांची पडताळणी करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बुकिंगपूर्वी करावे लागेल व्हेरिफिकेशन

हे त्या प्रवाशांसाठी आहे ज्यांनी मोठ्या कालावधीपासून ऑनलाइन तिकिट बुक केलेले नाही आणि मोठ्या कालावधीपासून मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय केलेला नाही. यामुळे व्हेरिफिकेशन करावे लागेल, ज्यामध्ये 1 मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ लागतो.

 

 

रेल्वेच्या नवीन नियमामागे आहे हे कारण

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे ट्रेन मोठ्या कालावधीपर्यंत बंद होत्या. या कालावधीत लोकांनी बुकिंग केले नाही. म्हणून ऑनलाइन तिकिट बुकिंगसाठी मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे.

 

 

असे करा व्हेरिफिकेशन

– IRCTC पोर्टलवर लॉगइन केल्यानंतर समोर व्हेरीफिकेशन विंडो उघडेल.

– त्यामध्ये अगोदरपासून रजिस्टर्ड ईमेल आणि मोबाइल नंबर टाका.

– नंतर व्हेरिफिकेशनच्या पर्यायावर क्लिक करा.

– यावेळी फोन नंबर आणि ईमेल आयडी बदलू शकता.

– तुमच्या मोबाइलवर आणि इमेलवर आलेला ओटीपी भरा

– नंतर व्हेरिफायची प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Web Title : indian railway irctc new rules for ticket booking mobile and email verification must before ticket

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बजाज कंपनीच्या बनावट अकाउंटद्वारे फसवणूक

Pune News | क्रिकेटच्या क्लासला जात असलेल्या 18 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, 11 वर्षीय भाऊ गंभीर जखमी; गॅरेज चालकाला अटक

Gold Price Today | खुशखबर ! सोने 11,000 रूपयांनी झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी ‘घसरण’; जाणून घ्या नवीन दर

 

 

Related Posts