IMPIMP

महापौर किशोरी पेडणेकरांवर 6 फ्लॅट बळकावल्याचा आरोप, हायकोर्टानं दिलं ‘हे’ निर्देश

by amol
Kishori-Pednekar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत हायकोर्टानं आज संबंधितांना 2 आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितलं आहे. एसआरए प्रकल्पात महापौर पेडणेकर यांनी 6 सदनिका बळकावल्या असा गंभीर आरोप सोमैया यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.

सोमैयांनी केले गंभीर आरोप

वरळीतील गोमाता जनता एसआरए प्रकल्पात लाभार्थी नसतानाही किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी जवळपास 6 सदनिका बेकायदेशीररित्या बळकावल्या आणि त्या सदनिकांच्या पत्त्यावर कंपन्याही स्थापन केल्या आहेत असे गंभीर आरोप सोमैया यांनी केले आहेत. या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करण्याचे आदेश द्यावेत आणि त्यांना नगरसेविका म्हणून अपात्र घोषित करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही द्यावेत अशी विनंतीही या याचिकेतून सोमैया यांनी केली आहे.

पेडणेकर यांनी दिलं होतं आव्हान

गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमैया हे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना लक्ष्य करत आहेत.
पेडणेकरांच्या मुलांच्या कंपनीला महापालिकेचं कंत्राट मिळालं आहे.
या कंपनीचा जो पत्ता आहे, त्याच पत्त्यावर आणखी 8 कंपन्यांची नोंद आहे.
या कंपन्या बोगस असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं चौकशी करावी अशी मागणी त्यांनी आधीच केली होती.
त्यावर सोमय्या यांनी फक्त आरोप करू नयेत त्याचे पुरावे द्यावेत आणि ते सिद्ध करावेत असं आव्हान पेडणेकर यांनी दिलं होतं.
या प्रकरणी चौकशी करण्यात यावी. यातून आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईन असंही पेडणेकर म्हणाल्या होत्या.

शेवटची 15 मिनिटं… जयंत पाटलांचा एक ‘कॉल’ अन् भाजपाची ‘दाणादाण’, जाणून घ्या कसा होता राष्ट्रवादीचा गेम ?

Related Posts