IMPIMP

Mumbai Sessions Court | ‘पत्नीशी जबरदस्तीनं शारिरीक संबंध बेकायदेशीर नाही; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्वाळा

by nagesh
Bombay High Court | mumbai bombay high court bjp girish mahajan maharashtra assembly speaker election governor bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) एक निकाल दिला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, ‘पत्नीसोबत जबरदस्तीनं, इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध (Physical contact) प्रस्थापित करणे बेकायदेशीर नाही, असा निकाल देत सत्र न्यायालयाकडून आरोपी पतीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Sessions Court) अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री घरत (Sanjashree Gharat) यांनी हा निर्वाळा केला आहे. एका महिलेनं आपल्या पतीविरुद्ध तिच्या इच्छेच्या विरोधात जाऊन जबरदस्तीनं शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केलाय. परंतु, कोणत्याही कायदेशीर चौकशीचं प्रकरण नाही, असे सत्र न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अधिक माहिती अशी, महिलेचं गेल्या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी विवाह झाला होता. त्या महिलेनं तक्रार
दाखल केली होती. यात म्हटलं आहे की, विवाहानंतर सदर महिलेवर पती आणि सासरच्या लोकांनी
अनेक बंधनं घालायला सुरुवात केली. सोबतच टोमणे मारणे, शिविगाळ करत पैशांची मागणी देखील केली. महिलेनं आरोप केला आहे की, विवाहाच्या एका महिन्यानंतर पतीनं तिच्यासोबत जबरदस्ती शारिरीक संबंध (Physical contact) प्रस्थापित केले. तिने म्हटलं आहे की, ‘ 2 जानेवारीला ते दोघे महाबळेश्वरला गेले होते. तिथं पतीनं जबरदस्तीनं शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानं तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती डॉक्टरांकडे गेली. त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिच्या कमरेखालील भागात लकवा मारल्याचं महिलेने म्हटलं आहे. असं महिलेने सांगितलं, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.

 

दरम्यान, या महिलेनं पती आणि इतर लोकांच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल केली. यानंतर तिच्या पतीनं अटकपूर्व जामीनासाठी (Pre-arrest bail) अर्ज केला. सुनावणी वेळी पती आणि त्याच्या
परिवारानं सांगितलं की, आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आम्ही हुंड्याची वगैरे मागणी
कधीच केली नाही. तसेच, पती होण्याच्या नात्यानं यात त्यानं काही चुकीचं केलेलं नाही. महिलेनं हुंडा
मागितल्यासंदर्भात तक्रार केली आहे. परंतु, किती हुंडा मागितला याची माहिती दिलेली नाही. तसेच
जबरदस्ती शारिरीक संबंधाला काही कायदेशीर आधार नाही. असं न्यायाधीशांनी (judge)
सांगितलं.

 

Web Title : Mumbai Sessions Court | forced physical relation in marriage cannot call it illegal says mumbai court grants bail to accused husband

 

हे देखील वाचा :

Union Home Ministers Medal – 2021 | महाराष्ट्रातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ जाहीर

Delta Plus Variant | महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या’ बळींची संख्या 3; लस घेतलेल्या महिलेचा देखील मुंबईत मृत्यू

National Automobile Scrappage Policy | PM मोदींकडून नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच, नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन मोफत

 

Related Posts