IMPIMP

National Automobile Scrappage Policy | PM मोदींकडून नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच, नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन मोफत

by nagesh
National Automobile Scrappage Policy | pm narendra modi nitin gadkari launches vehicle national automobile scrappage policy will get

नवी दिल्ली : वृत्तसंस्था National Automobile Scrappage Policy | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसीची (National Automobile Scrappage Policy) घोषणा केली आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंतवणूकदार शिखर परिषदेत भाग घेतला. त्यावेळी बोलताना त्यांनी नवीन स्क्रॅप पॉलिसी (Scraping policy) लाँच बाबत घोषणा केली आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) देखील ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.

 

आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑटोमोबाईल राष्ट्रीय स्क्रॅपिंग पॉलिसी (vehicle scrappage policy) लाँच बाबत मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, यामुळे देशात सकारात्मक परिवर्तन येणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोबिलीटी अर्थात गतिशीलता हा एक मोठा हिस्सा आहे. हा आर्थिक विकासासाठी खूप महत्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 देशासाठी पुढील पंचवीस वर्ष महत्वाची…

‘पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, ‘नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी (Scraping policy) वेस्ट टू वेल्थचा मंत्र पुढे नेईल. देशासाठी पुढील 25 वर्षे खूप महत्वाची आहेत. ज्या पद्धतीने तंत्रज्ञान बदलत आहे, त्यानुसार आपल्याला देखील बदल करायचा आहे. सध्या वातावरणातील बदलांच्या संकटाला सामोरे जात आहोत. म्हणून आपल्या फायद्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे लागेल असं पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. तसेच, इथेनॉल असेल की हायड्रोजन फ्युअलस इलेक्ट्रीक मोबिलीटी सरकारच्या या प्राथमिकतांमध्ये ऑटो इंडस्ट्रीचीही भूमिका महत्वाची आहे. कंपन्यांनी R&D ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपला सहभाग वाढवावा. यासाठी जी मदत लागेल ती सरकार देण्यास तयार असल्याचं आश्वासन देखील पंतप्रधान मोदींनी दिलं आहे.

 

 

स्क्रॅपेज पॉलिसी काय आहे?

स्क्रॅप करण्याच्या गाडीचे एक प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे नवीन गाडी खरेदी करताना तिची नोदंणी आणि रोड टॅक्सवर सवलत दिली जाणार आहे. जुन्या गाड्या वैज्ञानिक पद्धतीने तपासल्या जाणारा आहेत. नंतर, त्या स्क्रॅपमध्ये काढण्याची प्रक्रिया सुरु होईल. यामुळे ऑटो आणि धातूशी संबंधीत कंपन्यांना मोठा बूस्ट मिळेल.

 

 

फायदे काय?

– स्कॅपिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही याचा फायदा होईल.

– जुन्या गाडीचा मेन्टेनन्स अधिक असतो. रिपेअर कॉस्ट, फ्युअल इफिशिअन्सी याच्या माध्यमातून पैसे खर्च होतात. ते वाचणार आहेत.

– जुन्या गाड्यांमध्ये जुने तंत्रज्ञान असते. यामुळे रस्ते अपघाताचा धोका खूप असतो. यातून मुक्ती मिळेल.

– प्रदूषण कमी होईल. जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण खूप होते.

 

Web Title : National Automobile Scrappage Policy | pm narendra modi nitin gadkari launches vehicle national automobile scrappage policy will get

 

हे देखील वाचा :

Cyrus Poonawalla | सायरस पुनावाला यांची केंद्रावर जोरदार टीका, म्हणाले – ‘भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं’

Archeological Museum | पुण्यात उभारले जाणार देशातील पहिले ‘पुरातत्त्व’ म्युझियम

New Scrapping Policy | PM मोदींकडून मोठी घोषणा ! रस्त्यावरून हटवणार जुन्या गाड्या, कमी होईल प्रदुषण

 

Related Posts