IMPIMP

Delta Plus Variant | महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या’ बळींची संख्या 3; लस घेतलेल्या महिलेचा देखील मुंबईत मृत्यू

by nagesh
Delta Plus Variant | corona virus mumbai record 1st death from delta plus variant state count reach three

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन   महाराष्ट्रात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट नियंत्रणात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने (Maharashtra Government) राज्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. कोरोनाचा धोका जरी कमी आला असला तरी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Plus Variant) धोका निर्माण होताना दिसत आहे. ही एक धक्कादायक बाब समोर आली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant) मुंबईत (Mumbai) पहिला रुग्ण बळी गेला आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील एका 63 वर्षीय महिलेचा जुलै महिन्यात मृत्यू झाला. त्या महिलेचा मृत्यू अहवाल आता समोर आलाय. तर या महिलेचा मृत्यू (Death) डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झाल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट होत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या महिलेचा मृत्यू झाला तत्पूर्वी या महिलेनं कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona vaccine) दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर देखील या महिलेचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यूची संख्या तीन आहे.
मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या तिन्ही शहरात मृत्यू झाल्याचे समजते.
13 जूनला 80 वर्षीय एक महिलेचा रत्नागिरीत तसेच, 69 वर्षीय व्यक्तीचा नागोठाणेमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे (Delta Plus variant) मृत्यू झाला आहे.

 

मुंबईमध्ये 7 लोकांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची (Delta Plus variant) लागण झाली आहे.
त्यानंतर मुंबई पालिकेनं (BMC) या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच ट्रेसिंग सुरु केलं.
ही महिला त्या 7 लोकांमध्ये सहभागी होती. पालिकेनं अधिकारी जेव्हा महिलेच्या कुटुंबियांना भेटले त्यावेळी म्हणाले की, 27 जुलै रोजी महिलेचा मृत्यू झाला होता.
त्या मृत महिलेत्या संपर्कात आलेले आणखी दोघेजण डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झालीय.
असं जीनोम सीक्वेंसिंगच्या तपासात समोर आलंय की, याबाबत राज्य शासनाकडून मुंबई पालिकेला (BMC) सांगितलं होतं.

 

 

या दरम्यान, 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे झाला आहे.
त्यानंतर महिलेच्या संपर्कात आलेल्या इतर 6 जणांची तपासणी केली गेली.
या तपासणीत 6 पैकी दोघांचा डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे.
आता आणखी काही लोकांच्या चाचणीच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
याबाबत मुंबई आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे (Dr. Mangala Gomare) यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Delta Plus Variant | corona virus mumbai record 1st death from delta plus variant state count reach three

 

हे देखील वाचा :

National Automobile Scrappage Policy | PM मोदींकडून नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच, नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन मोफत

Cyrus Poonawalla | सायरस पुनावाला यांची केंद्रावर जोरदार टीका, म्हणाले – ‘भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं’

Archeological Museum | पुण्यात उभारले जाणार देशातील पहिले ‘पुरातत्त्व’ म्युझियम

 

Related Posts